महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

अजित पवार अखेर ‘देवेंद्रवासी’, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची होणार?

महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटणार ही शक्यता वर्तवली जात असतानाच आज मोठा राजकीय भूकंप घडला आहे. आज अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 30 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीपराव वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, सनिल पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रवादी फोडण्यात यश, पण शिंदे गटाचं काय?

राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असून त्यासोबतच बंडाचा स्वीकेल पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला राष्ट्रवादी फोडण्यात यश आले असलं, तरी आता शिंदे गटाचं काय स्थान असणार याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष करून उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची होणार?

निधी वाटपामध्ये त्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर सातत्याने राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला होता. मात्र, आता अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटाची आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची तर होणार नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीमधील ऑपरेशन सक्सेस झालं असलं तरी शिंदे गटाला काय मिळणार आणि त्यामधून लाभ किती मिळणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे.

Advertisements
Advertisements

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

या घडामोडी सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाराज तर नव्हते ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे मध्यंतरी अचानक तीन दिवस सुद्धा सुट्टीवर गेले होते. त्यावेळी सुद्धा राजकीय भुवया उंचावल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधील आमदार फोडून अजित पवार हे भाजप गटात जातील असं बोललं जात असतानाच मुख्यमंत्री शिंदे अचानक तीन दिवस गावी गेले होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button