परभणीपालममुख्य बातमी

जमिनीच्या दाव्याचा निकाल लागून ताबा मिळत नसल्यानं टोकाचं पाऊल

जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल ओतलं.

परभणी : जिल्हाधिकारी कार्यालयातच पालम तालुक्यातील दोन शेतकऱ्यांनी स्वतःच्या अंगावर डिझेल टाकून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. शेतजमिनीचा निर्णय लवकर मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी टोकाचं पाऊल उचललं. कुळ वहिवाट व शेतजमिनीचा निर्णय विरोधात गेल्याने पालम तालुक्यातील दुटका येथील दोन जणांनी मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात अंगावर डिझेल टाकून आत्मदहनाचा प्रयत्न केला. मात्र या प्रकरणाची आधीच भणक लागल्याने उपस्थित पोलीस कर्मचाऱ्यांनी दोघांनाही ताब्यात घेतले. त्यामुळेअनर्थ टळला.

पालम तालुक्यातील रोहीदास थोराजी गायकवाड व भगवान तोलाजी गायकवाड आणि नामदेव कोंडिबा व कुंडलिक कोंडिबा नळदूर्गे आणि इतरांमध्ये दुटका येथील जमिनीवर कुळ वहिवाट व शेतजमिनीचा ताबा घेण्यावरुन वाद सुरु होता. या संदर्भात रोहिदास गायकवाड व भगवान गायकवाड यांनी पालम न्यायालयाच्या निर्णयानुसार शेतजमीनीचा ताबा देण्याची मागणी एका निवेदनाद्वारे केली होती

लवकर निर्णय न घेतल्यास मंगळवार २८ नोव्हेंबर रोजी रोहिदास गायकवाड व भगवान गायकवाड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आत्मदहन करण्याचा इशारा निवेदनात दिला होता. त्यानुसार दुपारच्या सुमारास रोहीदास गायकवाड आणि भगवान गायकवाड यांनी अंगावर डिझेल टाकून स्वतःला पेटवून घेण्याचा प्रयत्न केला.केला. मात्र हजर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांनाही लागलीच ताब्यात घेतले. त्यांना नवामोंढा पोलिसात नेण्यात आले.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button