परभणीमहाराष्ट्र

बांगर यांचे आगमन होताच लग्नातही घुमल्या ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा

पाथरी : ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषाने सत्तेतील शिंदे गटाला विरोधकांनी सळो की पळो करून सोडले. संधी मिळताच शिंदे गटातील लोकप्रतिनिधींना ठाकरे गटातील कार्यकर्ते नाकीनऊ आणत आहेत. याचाच प्रत्यय तालुक्यातील देवेगाव येथे सोमवारी (ता. २९) झालेल्या एका लग्न सोहळ्यात आला. कळमनुरीचे आमदार संतोष बांगर यांचे आगमन होताच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी ‘पन्नास खोके एकदम ओके’च्या घोषणा दिल्या. त्यामुळे लग्नातील सनईऐवजी राजकीय सूर घुमल्याचे चित्र दिसत होते.

राज्यातील सत्तापरिवर्तनात शिवसेनेत उभी फूट पडल्याने असंतोष निर्माण झाला आहे. त्यातच भाजपसोबत युती केलेल्या शिंदे गटातील लोकप्रतिनिधींना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असल्याचे चित्र आहे. शेजारील नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकार आणि हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील हे शिंदे गटात सहभागी झाल्यावर कळमनुरीचे आमदार संतोष बांगर हेही अतिशय नाट्यमयरीत्या शिंदे गटात सहभागी झाले.

हिंगोली व नांदेड हे दोन्ही जिल्हे परभणीचे शेजारी असल्याने साहजिकच परभणीच्या आमदार, खासदारांकडे लक्ष लागले होते. परभणी हा सेनेचा बालेकिल्ला असून येथील दोन्हीही लोकप्रतिनिधी उद्धव ठाकरेंच्या पाठीशी कायम असल्याचे दाखवून दिले आहे. शिंदे गटात सहभागी झालेल्या लोकप्रतिनिधींना पाहताच उद्धव ठाकरे गटातील शिवसैनिकांमध्ये असंतोष निर्माण होतो हे सोमवारी देवेगाव येथे झालेल्या एका लग्न सोहळ्यात दिसून आले.

Advertisements
Advertisements

पाथरी तालुक्यातील देवेगाव येथील एका लग्न सोहळ्यात उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय जाधव व शिंदे गटातील आमदार संतोष बांगर हे समोरासमोर आले होते. यावेळी बांगर यांनी शिष्टाई दाखवत खासदार जाधव यांना चरणस्पर्श करून हस्तांदोलन केले. त्यामुळे सुरुवातीला अनेकांच्या भुवया उंचावल्या. खासदार जाधव यांनीही त्यांच्या बोलण्याला प्रतिसाद दिला. त्यानंतर ते निघून गेले. यावेळी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी मात्र संधी मिळताच ‘पन्नास खोके एकदम ओके’चा घोष केला. त्यामुळे लग्न सोहळ्याला राजकीय आखाड्याचे स्वरूप आले होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button