परभणीमराठवाड़ा

सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते निलंबीत

परभणी : परभणी येथील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते हे बीड येथे कार्यरत असतांना नियमबा पध्दतीने बोगस जड मालवाहू वाहनांची नवीन नोंद केल्या प्रकरणी त्यांना सेवेतुन निलंबीत केल्याचे आदेश उपरिवहन आयुक्त संजय मैत्रेवार यांनी बजावले आहेत.
परभणी येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयातील सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते हे परभणी येथे कार्यरत आहेत. त्यांच्या कामकाजाबद्दल अनेक तक्रारी यापुर्वीच करण्यात आलेल्या आहेत. दरम्यान नकाते हे बीड येथे कार्यरत असतांना नियमबा पद्धतीने बोगस जेड मालवाहू वाहनांची नवीन नोंदणी केली होती. हे गैरकृत्य केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

 

त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या निमय ३ चा भंग केल्याने त्यांच्या विरूद्ध नागरी सेवा नियम, १९७९ च्या नियम ८ खाली शिस्तभंगाची कारवाई प्रस्तावित केली होती. सहाय्यक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांना महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये सेवेतुन निलंबीत करण्यात आल्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान हा आदेश अंमलात असे पर्यंतच्या कालावधीत सहाय्यक परिवहन अधिकारी श्रीकृष्ण नकाते यांचे मुख्यालय धुळे येथील प्रादेशिक कार्यालय राहील व प्रादेशिक अधिकारी यांच्या पुर्व परवानगीशिवाय त्यांना मुख्यालय सोडता येणार नसल्याचे आदेशात नमुद केले आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button