जगात जर्मनी

पाथरीतील 40 सरपंच शिंदे गटात गेल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा – आ.बाबाजानी

पाथरीतील 40 सरपंच शिंदे गटात गेल्याचा मुख्यमंत्र्यांचा दावा खोटा – आ.बाबाजानी

परभणी/प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसचे पाथरी तालुक्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केल्याचा दावा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या अधिकृत पेजवरून केलेला आहे. मात्र हा दावा साफ खोटा असून प्रवेश केलेल्यांमधील एकजण वगळता राष्ट्रवादीचे सर्व सरपंच पक्षाशी एकनिष्ठ आहेत, अशी माहिती आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी आज रविवारी (दि.22) परभणी येथे पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी भवनात झालेल्या या पत्रकार परिषदेला खासदार डॉ.फौजिया खान, माजी आमदार विजयराव गव्हाणे, तहेसिन खान, संतोष देशमुख, नखाते आदी उपस्थित होते.
पाथरी तालुक्यातील 40 सरपंचांनी शिंदे गटात प्रवेश घेतल्याची बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांच्या फेसबुकवर प्रसारित केली. तालुक्यात एकूण 49 सरपंच आहेत, त्यातील कोणत्या 40 सरपंच यांनी प्रवेश घेतला याचा खुलासा मुख्यमंत्री यांनी करावा!

Advertisements
Advertisements

प्रत्यक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 34 सरपंच व अन्य सर्व पक्षाचे मिळून 15 आहेत. त्यामुळे राज्याच्या प्रमुख पदावरील व्यक्तीने खोटी बातमी प्रसारित करणे हे अत्यंत चुकीचे आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button