जगात जर्मनीदेश -विदेशमुख्य बातमीराजकारण

BIG NEWS : 4 राज्यात दारूण पराभव झाल्यानंतर काँग्रेसचा बडा नेता राजीनामा देण्याच्या तयारीत

नुकतंच 4 राज्यात विधानसभा निवडणुका झाल्या. यात मध्यप्रदेशमध्ये काँग्रेसचा दारूण पराभव झाला. त्यानंतर आता काँग्रेसमध्ये हालचाली वाढल्या आहेत. काँग्रेसमध्ये राजीनामा सत्र सुरु होणार का? अशी चर्चा होतेय. कारण काँग्रेसचा बडा चेहरा आता राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कमलनाथ हे प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. आजच कमलनाथ आपला राजीनामा काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडे सोपवण्याची शक्यता आहे. मध्यप्रदेशमध्ये झालेल्या पराभवानंतर काँग्रेस हायकमांड कमलनाथ यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय. त्याचमुळे कमलनाथ आपला राजीनामा देण्याची शक्यता आहे.

मध्यप्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या नेतृत्वात काँग्रेसने विधानसभा निवडणूक लढवली. पण या निवडणुकीत काँग्रेसचा मोठ्या फरकाने पराभव झाला. अशात कमलनाथ यांच्या नेतृत्वावर काँग्रेस हायकमांड नाराज असल्याची माहिती आहे. पराभवानंतर पक्षातील नेत्यांना भेटण्याऐवजी, कार्यकर्त्यांशी चर्चा करण्याऐवजी कमलनाथ यांनी भाजपचे नेते शिवराज सिंह चौहान यांची भेट घेतली. त्यांच्या घरी जात त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचं अभिनंदन केलं. कमलनाथ यांच्या या कृतीवर काँग्रेस हायकमांड कमलनाथ यांच्यावर नाराज असल्याचं कळतंय.

मध्यप्रदेशमधील निकाल अन् नाराजी

मध्यप्रदेशमधल्या 230 जागांपैकी भाजपला 163 जागांवर विजय मिळाला. तर काँग्रेस केवळ 66 जागांवरच विजय होऊ शकली. तर इतरांना 1 जागा मिळाली. या निकालानंतर कमलनाथ यांच्यावर दिल्लीत नाराजी असल्याचं बोललं जात आहे.

Advertisements
Advertisements

आज भोपाळमध्ये बैठक

आज मध्यप्रदेशात काँग्रेसची बैठक होणार आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभववर विचार मंथन करण्यासाठी बैठक बोलावली आहे. 230 उमेदवारांना या बैठकीला बोलावण्यात आलं आहे. कमलनाथ यांच्याकडे कांग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी आहे. त्यांचा राजीनामा मागितला जाणार असल्याची माहिती आहे. काँग्रेसने पत्रक काढत 230 उमेदवारानं बैठकीला बोलवलं आहे. आज मध्यप्रदेशच्या भोपाळमध्ये ही बैठक होत आहे.

कमलनाथ यांच्याविरोधात नाराजीचा सूर

या निवडणुकीत तिकीट वाटपावेळी कमलनाथ यांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना सामावून घेतलं नाही, अशी मध्यप्रदेशच्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. कमलनाथ यांनी अखिलेश यादव आणि नीतीश कुमार यांच्यावर केलेल्या टीपण्णीमुळे नाराजी पसरली. शिवाय मित्रपक्षांना हव्या असलेल्या जागाही द्यायला कमलनाथ यांनी असहमती दर्शवली. त्यानंतर आता कमलनाथ यांच्यावर काँग्रेस हायकमांड नाराज आहेत. त्यामुळे त्यांना राजीनामा द्यायला लागू शकतो.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button