महाराष्ट्रमुख्य बातमी

देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब!

नागपूर : महाराष्ट्राचे गृहमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांच्या घराबाहेर काल रात्री एक थरार नाट्य घडलं.नागपूर पोलिसांच्या  कंट्रोल रुमचा फोन रात्री दोन वाजता खणाणला. देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब ठेवल्याची धमकी देण्यात आली. रात्रीतून नागपूर पोलिसांच्या बॉम्ब पथकाने फडणवीस यांच्या घराची झाडाझडती सुरु केली. तपासानंतर तिथं कोणताही बॉम्ब आढळून आला नाही. तो फेक कॉल असल्याचं निष्पन्न झालं. अखेर नागपूर पोलिसांनी हा खोटी माहिती देणारा कॉल कुणी केला, याचा तपास केला आणि सदर व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं.

नागपूर कंट्रोल रुमाल फोन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर त्याची चौकशी केली. तेव्हा आपण तणावाखाली होतो. कुठेतरी लक्ष विचलित करण्यासाठी असा कॉल केल्याचं सदर व्यक्तीने सांगितलं. नागपूर पोलीस कमिशनर अमितेश कुमार यांनी ही माहिती दिली आहे.

रात्रभर बॉम्बची शोधाशोध

फडणवीस यांच्या घरासमोर बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच नागपूर पोलीस अलर्ट झाले. फडणवीस यांच्या घराबाहेर तत्काळ बॉम्बशोधक पथकाला पाठवण्यात आलं. तपास मोहीम वेगानं राबवली गेली. सलग तासभर शोधाशोध झाली. पण कुठेही बॉम्ब अथवा स्फोटकं आढळून आली नाहीत. त्यामुळे कुणीतरी हा फेक कॉल केला असावा, असा संशय पोलिसांना आला.

Advertisements
Advertisements

नागपूर पोलिसांनी सदर कॉल करणाऱ्या व्यक्तीलाही तत्काळ हेरलं. त्याची चौकशी झाली. या चौकशीत त्याने हा प्रकार करण्यामागचं कारण सांगितलं. ते ऐकून पोलीसही चक्रावले. घरातला वीजपुरवठा खंडीत झाला होता. त्यामुळे राग आल्याने फडणवीस यांच्या घराबाहेर बॉम्ब असल्याचा फोन केल्याचं सदर व्यक्तीने सांगितलं. या प्रकारानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेरील सुरक्षा आणखी वाढवण्यात आलेली नाही. पूर्वप्रमाणेच सुरक्षारक्षत तेथे तैनात आहेत. मात्र एका फोनमुळे नागपूर पोलिसांमध्ये अक्षरशः खळबळ माजली होती.

गडकरींना धमकी देणारा आज नागपुरात दाखल

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना धमकी देणारा, गडकरींच्या कार्यालयात फोन करुन खंडणी मागणारा आरोपी जयेश पुजाराला नागपूर पोलीसांनी ताब्यात घेतलंय. बेळगाव तुरुंगात फाशीचा कैदी असलेल्या जयेश पुजाराने गडकरींच्या कार्यालयात दोन वेळा फोन करत, खंडणी मागीतली होती. याच प्रकरणात बेळगाव तुरुंगातून ताबा घेत नागपूर पोलीसांनी जयेश पुजारा याला नागपुरात आणलंय…. आता गडकरींना धमकी देण्यामागे त्याचा काय उद्देश होता? याबाबत जयेश पुजाराची नागपूर पोलीस कसून चौकशी करतायत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button