परभणी

बोर्डीकर, विटेकर, मुरकुटे, बाबाजानी,फड,लहाने आले एकत्र ! म्हणे लोकसभा लढविणार

परभणी,दि.12(प्रतिनिधी) : राज्याप्रमाणेच जिल्ह्यातसुध्दा महायुतीतील घटकपक्षात व नेतेमंडळींमध्ये समन्वय असल्याचा दावा महायुतीतील नेतेमंडळींनी शुक्रवार 12 जानेवारी रोजी पत्रकार परिषदेतून केला.

जिल्ह्यातील अन्य पदाधिकारी व सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत समन्वयाचा संदेश जावा या दृष्टीकोनातून 17 जानेवारी रोजी परभणीत रेणूका मंगल कार्यालयात महायुतीचा समन्वय मेळावाही आयोजित करण्यात आला असल्याची माहिती नेतेमंडळींनी दिली.

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार सौ. मेघना साकोरे-बोर्डीकर, जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष आमदार बाबाजानी दुर्राणी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राजेश विटेकर, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी आमदार हरिभाऊ लहाणे, जिल्हा प्रमुख व्यंकटराव कदम, माधवराव कदम, माजी आमदार मोहन फड, भारतीय जनता पार्टीच्या उद्योग आघाडीचे प्रदेशाध्यक्ष प्रमोद वाकोडकर, महानगर जिल्हाध्यक्ष राजेश देशमुख, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, प्रदेश कार्यकारणी सदस्य संजय शेळके यांच्यासह अन्य यावेळी उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

राज्याप्रमाणे जिल्ह्यातील महायुतीतील घटकपक्षात व नेतेमंडळीत सातत्याने सुसंवाद आहे. समन्वय कायम आहे, असा दावा सार्‍या नेतेमंडळींनी केला. सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत महायुतीतील समन्वयाचा संदेश जावा, या दृष्टीने 17 जानेवारी रोजी पाथरी रस्त्यावरील रेणूका मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा विशेष मेळावा आयोजित करण्यात आला आहे, असेही नमूद केले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button