क्रीडा

ब्रिजभूषण सिंहांचं तारतम्य ढळलं; स्वतःची तुलना केली रामाशी, आंदोलकांना म्हणाले मंथरा

कुस्ती महासंघाचे अध्यक्ष तथा खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याभोवती सुरु असलेलं वादंग थांबायचं नाव घेत नाहीये. आज त्यांनी स्वतःची तुलना थेट प्रभू श्रीरामाशी केल्याने टीका होत आहे.

ब्रिजभूषण सिंह यांच्यांवर लैंगिक शोषणाचे आरोप आहेत. मागच्या महिन्याभरापासून महिला पैलवान दिल्लीत धरणं आंदोलन करीत आहेत. ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गुन्हा दाखल झालेला असला तरी त्यांच्या अटकेच्या मागणीवर पैलवान ठाम आहेत. याचदरम्यान आज ब्रिजभूषण सिंह यांनी एक वादग्रस्त विधान केलं आहे. त्यांनी महिला पैलवानांना मंथरा म्हटलं आहे तर स्वतःची तुलना रामाशी केलीय. ते आपल्या मतदारसंघात गौंडाच्या धनईगंज येथे एका कार्यक्रमात बोलत होते.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button