देश -विदेश

पुरातून सावरणाऱ्या तामिळनाडूत आज पुन्हा पावसाची शक्यता

देशात आता थंडीचा कडाका   वाढताना दिसत आहे. आज मंगळवारपासून देशभरात तापमानाचा पारा आणखी खाली घसरण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेशसह  महाराष्ट्रात  गारठा  वाढला आहे. तर काही भागात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. भारतीय हवामान विभागाने  दिलेल्या ताज्या महितीनुसार, 26 डिसेंबर ते 27 डिसेंबरदरम्यान पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये विविध भागात सकाळी धुक्याची चादर पाहायला मिळणार आहे, राजस्थानमध्ये काही ठिकाणी पावसाची रिमझिम पाहायला मिळू शकते. पर्वतीय भागात जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. त्यामुळे उत्तर भारतात थंडीची लाट आली आहे. याचा परिणाम  महाराष्ट्राच्या हवामानावर होताना दिसत आहे. [weather update today imd alert rain prediction in tamil nadu]

पूरग्रस्त तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाची शक्यता

जम्मू-काश्मीरसह डोंगराळ भागात पाऊस आणि बर्फवृष्टीची शक्यता आहे. एकीकडे पर्वतीय भागात बर्फवृष्टी सुरु असताना थंड वाऱ्यांमुळे मैदानी भागात हुडहुडी वाढली आहे. भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार आज तामिळनाडूमध्ये पुन्हा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तामिळनाडूमध्ये किनारपट्टी भागात मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यासह देशाच्या तापमानात कमालीची घट झाली आहे.

‘या’ भागात पावसाची शक्यता

Advertisements
Advertisements

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, ईशान्येकडील जोरदार वाऱ्यांच्या प्रभावामुळे 30 डिसेंबर 2023 ते 1 जानेवारी 2024 पर्यंत किनारपट्टीवर तामिळनाडूवर हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यासोबतच 27 आणि 28 डिसेंबरला तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, रविवारी पश्चिम, उत्तर आणि पूर्व राजस्थानच्या काही भागांमध्ये दाट ते दाट धुके दिसून आलं. येत्या दोन-तीन दिवसांत राजस्थानच्या उत्तर आणि पूर्व भागात विविध ठिकाणी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तसेच, किमान तापमानात किंचित घट होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 31 डिसेंबरपासून आणखी एक नवीन वेस्टर्न डिस्टर्बन्स सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा हवामानात बदल होण्याची शक्यता आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button