महाराष्ट्र

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने मुंबई येथे एक लाख संविधान प्रति वाटप

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने दादर, मुंबई येथे एक लाख संविधान वाटप सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न.

परभणी

भारतीय संविधान दिनाचे औचित्य साधून आज बी एम वैद्य सभागृह, राजगृहा जवळ हिंदु कॉलनी दादर, मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्यावतीने संविधान गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.

या प्रसंगी एक लाख संविधान प्रति वितरणाचा शुभारंभ करण्यात आला. आरंभी चैत्यभूमी येथे महामानव परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. राजगृहापासून कार्यक्रम स्थळापर्यंत भव्य संविधान दिंडी काढण्यात आली होती. अत्यंत उत्साहात पार पडलेल्या या कार्यक्रमास अखिल भारतीय कांग्रेस कमिटीच्या एससी, एसटी, ओबीसी आणि अल्पसंख्यांक विभागाचे राष्ट्रीय प्रभारी श्री के.राजू , महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले साहेब, अखिल भारतीय काँग्रेसच्या अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष आदरणीय राजेश लिलोठीया , राज्याच्या माजी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई प्रदेश काँग्रेस अध्यक्षा  प्रा.वर्षाताई गायकवाड, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.डॉ.सिध्दार्थजी हत्तीअंबीरे, कचरू यादव, प्रदेश सरचिटणीस .देवानंद पवार, प्रदेश काँग्रेस प्रवक्ते डॉ.राजू वाघमारे तसेच काँग्रेस राज्यातील प्रमुख पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. भारतीय संविधान महाराष्ट्रातील घराघरात पोहोचवण्याचा संकल्प याप्रसंगी करण्यात आला.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button