महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

मंत्रालयाला टाळं ठोकलं; मंत्रालयाच्या दारात आमदारांचा आक्रोश

आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. मराठा आंदोलनाची धग आता मंत्रालयापर्यंत पोहोचली आहे. ठिकठिकाणी आंदोलनं केली जात आहेत. उपोषण केलं जात आहे. अशातच मंत्रालय परिसरात आमदार आकोश करताना दिसत आहेत. मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदार आंदोलन करत आहेत. मंत्रालयालाला कुलुप लावण्यात आलं आहे. कोणत्याही मंत्र्याला आम्ही मंत्रालयात जाऊ देणार नाही. मराठा आरक्षणासाठी अधिवेशन बोलवा, अशी मागणी हे आमदार करत आहेत. यावेळी या आमदारांनी आपला आक्रोश व्यक्त केला.

मंत्रलय परिसरात सध्या आमदार आंदोलन करत आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आंदोलन केलं जात आहे. राजू नवघरे, अमोल मिटकरी, राहुल पाटील, कैलास पाटील, विक्रम काळे, चेतन तुपे, बाबासाहेब आजबे, यशवंत माने, निलेश लंके , बाळासाहेब पाटील, दिलीप बनकर, बाबाजानी दुर्रानी, मोहन उबर्डे हे आमदार मंत्रालय परिसरात आंदोलन करत आहेत.

मराठा आरक्षणासाठी सर्वपक्षीय आमदारांनी भूमिका घ्यावी.त्यांनी सरकारसमोर बाजू मांडावी, अशी मागणी सर्वसामान्य मराठा बांधव करत आहेत. तसंच सरकारनं विशेष अधिवेशन बोलवून मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी हे आंदोलक करत आहेत. याच मागणीला घेऊन आज मंत्रालय परिसरात आंदोलन करण्यात आलं. यावेळी या आमदारांनी विशेष अधिवेशनाची मागणी केली आहे.

Advertisements
Advertisements

मनोज जरांगे पाटील हे अंतरवली सराटी गावात आमरण उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज आठवा दिवस आहे. त्यांची तब्येत खालावते. त्यामुळे परवापासून ते पाणी पीत आहेत. पण आजच्या दिवसभरात सरकारने आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, अन्यथा आजपासून पुन्हा एकदा जलत्याग करण्याचा इशारा त्यांनी दिलाय. या पार्श्वभूमीवर आमदारांचं सुरु असलेलं हे आंदोलन लक्षवेधी ठरत आहे.

सह्याद्री अतिथीगृहात आज सर्वपक्षीय बैठक पार पडते आहे. या बैठकीत मराठा आरक्षण प्रश्नावर होत आहे. या बैठकीला सर्व पक्षाचे नेते उपस्थित आहेत. त्यामुळे या बैठकीतून काय समोर येतं. मराठा आरक्षणावर तोडगा निघतो का? हे पाहणं महत्वाचं आहे.

दरम्यान आज सकाळी आकाशवाणी आमदार निवास या ठिकाणी गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या गाडीच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे हे आंदोलन आता अधिक तीव्र होत चाललं आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button