महाराष्ट्रराजकारण

काँग्रेस नेते आशिष देशमुख राष्ट्रवादीच्या वाटेवर

काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस आता चव्हाट्यावर यायला लागली आहे. कारण काँग्रेस नेते आशिष देशमुख हे गेल्या दोन दिवसांपासून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर गंभीर आरोप करत आहेत. मात्र आशिष देशमुख लवकरच काँग्रेसला राम राम करत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

काँग्रेस नेते आशिष देशमुख लवकरच नागपुरमध्ये राष्ट्रवादीचा मेळावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच या मेळाव्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि विरोधी पक्ष नेते अजित पवार देखील उपस्थित राहणार आहेत.

अशात त्यांच्यांवर कारवाईची दाट शक्यता आहे. त्यामुळे ते राष्ट्रवादीच्या संर्पकात आहेत. मागील काही दिवसांपुर्वी त्यांनी अजित पवार आणि शरद पवार यांची भेट घेतली होती. त्यामुळे काय होत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान आशिष देशमुख सतत नाना पटोले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप करत आहेत. आज देखील माध्यमांशी बोलतांना त्यांनी नाना पटोले यांच्यावर टीका केली, ते म्हणाले नाना पटोले येत्या काळातील निवडणुका स्वबळावर लढणाची तयारी करत आहे. ते वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button