महाराष्ट्रराजकारण

राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांचा ‘मोदी आयो रे’वर डान्स

वाशिम : वाशिम जिल्हा परिषदेचे अध्यक्ष, तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांचा एक व्हिडिओ जिल्ह्यात सध्या सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. या व्हिडिओत चंद्रकांत ठाकरे ‘मोदी आयो रे’ गाण्यावर डान्स करत आहेत. वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर तालुक्यातील एका होलिकोत्सव कार्यक्रमात त्यांनी ह्या गाण्यावर ठेका धरला.

चंद्रकांत ठाकरे हे राष्ट्रवादीचे माजी मंत्री सुभाष ठाकरे यांचे चिरंजीव आहेत. राष्ट्रवादीचे जिल्ह्यातील सर्वात महत्वाचे नेते मानले जातात. तसेच ते विरोधीपक्ष नेते अजित पवार यांचेही निकटवर्तीय आहेत. मात्र आता तेच मोदी आयो रे गाण्यावर डान्स करत असल्याने जोरदार चर्चा आहे.

विशेष म्हणजे या आधीही देवेंद्र फडणवीस हे वाशिम जिल्ह्यात आले असताना त्यांची भेट घेतल्याने चंद्रकांत ठाकरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा रंगल्या होत्या.

चंद्रकांत ठाकरे यांच्या नेतृत्वात जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादीने चांगलीच मुसंडी घेतली होती व तब्बल १४ जिल्हा परिषद सदस्य निवडून आणत राष्ट्रवादी सर्वात मोठा पक्ष ठरला होता. काँग्रेस व वंचितसोबत युती करून ठाकरे जिल्हा परिषद अध्यक्ष झाले मात्र नंतर ओबीसी आरक्षणामुळे त्यांचे जिल्हा परिषद सदस्यपद रद्द झाले होते. त्यामुळे अध्यक्षपद त्यांना सोडावे लागले होते.

Advertisements
Advertisements

नंतर पुन्हा झालेल्या पोटनिवडणुकीत ते फारच थोड्या मताने विजयी झाले व पुन्हा जिल्हा परिषद अध्यक्ष झाले. आता भाजपच्या ताब्यात असलेल्या कारंजा-मानोरा विधानसभा मतदार संघातून २०२४ साठी ते इच्छुक आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button