महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

देवेंद्र फडणवीस रात्री मुख्यमंत्र्यांच्या ठाण्याच्या निवासस्थानी

राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून अनेक घडामोडी घडत आहेत. मंत्रीमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावरून सध्या राजकारण चांगलचं तापलं आहे. अशातच राज्याच बैठकांचं सत्र सुरू झालं आहे. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यामध्ये वारंवार बैठका होतं असल्याचं दिसून येत आहे.

तर काल रात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले. फडणवीस रात्री इतक्या उशिरा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी दाखल झाल्यामूळे राजकीय वर्तुळातील नेत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या रात्रीच्या भेटीचं कारण समजू शकलेलं नाही. परंतु राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराचा आणि खातेवाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर सातत्याने बैठकांचं सत्र सुरु आहे.

Advertisements
Advertisements

एकीकडे अजित पवार आणि अमित शाह यांच्या भेटीमध्ये अजित पवार यांच्या मागण्या 90 टक्के मान्य झाल्याच्या चर्चा सुरू होत्या. तर मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती काही वृत्तवाहिन्यांनी सूत्रांच्या हवाल्याने दिल्या आहेत. तर खातेवाटप आज उद्यामध्ये जाहीर होणार असल्याची चर्चा सुरू असताना काल रात्री फडणवीस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील निवासस्थानी दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या विषयीच्या वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांमद्धे सातत्याने बैठका होत आहेत. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुंबईतील ‘वर्षा’ या शासकीय निवासस्थानी बैठक पार पडली. या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते.(Latest Marathi News)

अद्यापही बैठकांचं संत्र सुरुच आहे. शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांची काल (गुरुवारी) सकाळीसुद्धा ‘वर्षा’वर बैठक पार पडली. त्यानंतर अजित पवार यांनी फडणवीस यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती. त्यावेळी दोघांमध्ये चर्चा झाली होती. त्यानंतर आता रात्री उशिरा फडणवीस आणि शिंदे यांच्यात बैठक पार पडली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button