क्राईममहाराष्ट्र

बीडमध्ये अंदाधुंद गोळीबार: दोन जण जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक, शहरात खळबळ

बीड: शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या परिसरात दोन गटांमध्ये झालेल्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या गोळीबारात दोन जण जखमी झाले असून यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. दोन्ही जखमींवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून घटनास्थळी पोलीस प्रशासन तळ ठोकून आहे.

बीड शहरात आणि जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत असल्याच चित्र आहे. अशातच शुक्रवारी रात्री उशिरा शहरातील कालिका नगर ते सराटा फाटा या दरम्यान दोन गटांमध्ये अज्ञात कारणावरून हाणामारी झाली. या हाणामारीचं रूपांतर नंतर थेट गोळीबारात झालं. गायकवाड नामक व्यक्तीने अंदाधुंद गोळीबार केल्याने दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येते. या दोघांवरही बीडच्या जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे.\

या दोन गटांमध्ये वाद होण्याचं नेमकं कारण काय होतं, हे अद्याप अस्पष्ट आहे. मात्र रात्री झालेल्या या गोळीबाराने शहरात काही काळासाठी तळावाचे वातावरण निर्माण झाले होते. या घटनेनंतर पोलीस प्रशासनाने तात्काळ धाव घेत घटनेच्या ठिकाणी तळ ठोकला. त्याचबरोबर या दोन्हीही गटातील लोकांचा प्रशासन शोध घेत आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान, या घटनेची माहिती रात्री उशिरा शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलीस प्रशासनाचा वचक कमी झाला आहे का, असा प्रश्न सर्वसामान्यांकडून उपस्थित केला जात आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button