परभणी

नागोबा मंदिराच्या जागेची सरकारी मोजणी पूर्ण

परभणी : शहरातील मध्यवस्तीतील गुलशनाबाद भागातील नागोबा मंदिराच्या जागेची आज भूमि अभिलेख विभागाच्या अधिकारी, कर्मचा-यांनी पोलीस बंदोबस्तात मोजणी पूर्ण केली. शहरातील यशवंत आयटी कॉलेजच्या बाजूच्या भागातील नागोबा मंदिराच्या नियोजित जागेवर काही अतिक्रमणे झाली होती. त्यामुळे मंदिर समिती व विविध पक्षाच्या नेतेमंडळीचा या अतिक्रमणकर्त्यांबरोबर वाद सुरू होता. अखेर भूमि अभिलेख विभागाच्या मार्फत मोजणी पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्याप्रमाणे भूमि अभिलेख विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी पोलीस बंदोबस्तात या मोकळ्या जागेची मोजणी केली. मोजणी केलेल्या जागेवर खुणा करून या ठिकाणी पोल देखील उभारण्यात आले आहेत. यावेळी भारतीय जनता पक्षाचे परभणी विधानसभा प्रमुख आनंद भरोसे, सामाजिक कार्यकर्ते रितेश जैन यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच आमदार डॉ.राहुल पाटील यांच्यासह अन्य सहकार्यांनी घटनास्थळी भेट देवून पुढील प्रक्रिया संदर्भात विचार विनिमय करण्यात आला.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button