महाराष्ट्रराजकारण

गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणविरोधात पुन्हा हायकोर्टात

मुंबई: राज्यातील मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मंगळवारी राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहाच्या पटलावर मराठा आरक्षण विधेयक  मांडले. हे विधेयक कोणत्याही चर्चेविनाच एकमताने मंजूर करण्यात आले. मात्र, मराठा आरक्षण विधेयक मंजूर होऊन काही क्षण उलटत नाही तोच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणाचे विरोधक गुणरत्न सदावर्ते  यांनी या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा केली आहे. हे संविधान सहमत कृत्य नाही. राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती सुनील शुक्रे  हे मराठा चळवळीतील कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांच्या अहवालाला महत्त्व देऊ नये. राज्य सरकारने हा अहवाल स्वीकारला तर आम्ही त्याला उच्च न्यायालयात आव्हान देऊ, असे गुणरत्न सदावर्ते यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button