देश -विदेशराजकारण

राहुल गांधींना दिलासा देणारा निर्णय हायकोर्टाने घेतला मागे

रांची : झारखंड उच्च न्यायालयाने राहुल गांधी यांना मोठा धक्का दिला आहे. भाजप नेते अमित शहा यांच्याविरोधात आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप राहुल गांधींवर आहे. याप्रकरणी २०२२ मध्ये कोर्टाने राहुल गांधींना दिलासा दिला होता. दरम्यान, या प्रकरणावर पुन्हा सुवावणी होणार असून राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ होणार आहे.

न्यायमूर्ती अनिलकुमार चौधरी यांच्या खंडपीठाने दिलेल्या निर्देशानुसार, चाईबासा न्यायालयात दाखल केलेल्या फौजदारी तक्रारीला आव्हान देणा-या याचिकेवर सुनावणी करण्यास राहुल गांधी तयार नाहीत असे न्यायालयाने निरीक्षण केले आहे.

नेमके काय आहे प्रकरण?

Advertisements
Advertisements

२०१८ मध्ये चाईबासा येथे झालेल्या काँग्रेसच्या कार्यक्रमादरम्यान राहुल गांधी यांनी भाजपचे तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्यावर टीका करताना म्हटले होते की, एक खुनी व्यक्ती केवळ भाजपमध्ये राष्ट्रीय अध्यक्ष होऊ शकतो, काँग्रेसमध्ये नाही. राहुल गांधींनी अमित शहा यांच्याविरोधात केलेल्या या वक्तव्यावर आक्षेप घेत भाजप नेते नवीन झा यांनी कनिष्ठ न्यायालयात याचिका दाखल करून मानहानीचा खटला दाखल केला होता. राहुल गांधी यांच्या बाजूने न्यायालयात युक्तिवाद करताना वकील पियुष चित्रेश म्हणाले की, ज्या प्रकारचे आरोप केले जात आहेत ते योग्य नाहीत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button