महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

आमदार अपात्रतेच्या निकालापूर्वी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत झाले महत्वाचे निर्णय

मुंबई : शिवसेना आमदारांसाठी बुधवारचा दिवस महत्वाचा आहे. शिवसेना आमदार अपात्र प्रकरणाचा निकाल येणार आहे. त्याचवेळी राज्याच्या मंत्रिमंडळाची बैठक झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली. या बैठकीत अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा आणि शिवजयंतीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला. या दोन्ही दिवसाच्या निमित्ताने राज्यातील नागरिकांना आनंदाचा शिधा मिळणार आहे. तसेच ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास करमुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे.

मंत्रिमंडळाचे निर्णय कोणते

राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आनंदाचा शिधा देण्याचा निर्णय राज्याच्या मंत्रिमंडळाने घेतला आहे. राज्यात नागरी भागातील अतितीव्र कुपोषित बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यात येणार आहे. तसेच ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नवीन निधी मंजूर करण्यात आला आहे. विरार येथील जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी दिली गेली आहे. महात्मा फुले आणि त्यांच्या पत्नी सावित्रीबाई फुले यांच्या आयुष्यावर असलेला सत्यशोधक हा चित्रपट करमुक्त करण्याची मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली होती.

घरकुलासाठी एक लाख अनुदान

पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान ५० हजारांवरूनवरुन रुपये एक लाखांपर्यंत करण्यास मान्यता दिली आहे. महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम, १९९९ लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार दिले जाणार आहे.

Advertisements
Advertisements

न्यायालयात पदांची निर्मिती

राज्यातील न्यायालयात अधिकाऱ्यांची अतिरिक्त २८६३ पदे निर्माण करण्यात येणार आहे. तसेच सहाय्यभूत ११०६४ पदे निर्माण करण्याबाबत आणि ५८०३ बाहययंत्रणेद्वारे उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

मंत्रिमंडळाच्या बैठकीतील धडाकेबाज निर्णय

  • राज्यात नागरी भागातील  अतितीव्र कुपोषित (SAM) बालकांसाठी नागरी बाल विकास केंद्र सुरू करण्यास मान्यता.
  • ग्रामविकास विभागातील योजनांच्या जाहिरात व प्रसिद्धीसाठी नविन लेखाशिर्ष उघडण्यास मंजुरी
  • शासकिय लेख्यातून (मकोनी नमुना क्रमांक 44 द्वारे) आहरित करण्यात आलेल्या सहायक अनुदानाच्या जलद संवितरण व संनियंत्रणासाठी आहरण व संवितरण अधिकारी आणि अन्य अशासकीय कार्यान्वयन प्राधिकारी यांच्याकरिता आभासी वैयक्तिक ठेव लेखा कार्यपद्धती लागू करण्यास मंजुरी.
  •  ‘सत्यशोधक’ मराठी चित्रपटास राज्य वस्तू व सेवा कर कायद्यांतर्गत आकारल्या जाणाऱ्या राज्य वस्तू व सेवा कराच्या प्रतिपूर्तीस मंजुरी
  • जिल्हा दिव्यांग पुनर्वसन केंद्र विरार या कार्यालयातील कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी योजना व सेवानिवृत्ती वेतन योजना लागू करण्यास मंजुरी
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन पात्र लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी द्यावयाचे अनुदान .50 हजारांवरूनएक लाखांपर्यंत करण्यास मान्यता
  • महाराष्ट्र प्रकल्पबाधित व्यक्तींचे पुनर्वसन अधिनियम,1999 लागू असलेल्या पाटबंधारे प्रकल्पाच्या बाधित परिमंडळातील गावठाणामधून स्थलांतरीत न झालेल्या गावठाणातील प्रकल्पग्रस्तांना नवीन पुनर्वसित गावठाणाऐवजी रोख रक्कम स्वरुपात आर्थिक पॅकेज देणार
  •  राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत पात्र शिधापत्रिकाधारकांना श्रीराम प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त व छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त प्रति शिधापत्रिका  आनंदाचा शिधा देण्यास मंजुरी

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button