परभणी

प्रभाग १५ मध्ये निर्माल्य संकलन वाहनाचे लोकार्पण

परभणी : शहरातील वसमत रोडवरील प्रभाग १५ मधील जागृती हनुमान मंदिर येथे मनपा गटनेत्या तथा भाजपा माजी नगरसेविका मंगलताई मुद्गलकर यांच्या पुढाकारातून रविवार, दि.२८ मे रोजी निर्माल्य संकलन वाहनाचे लोकार्पण करण्यात आले. या वाहनाद्वारे दर रविवारी प्रभागातील निर्माल्याचे संकलन करण्यात येणार आहे. नागरीकांनी या वाहनांमध्ये फक्त निर्माल्य टाकून निर्माल्य वाहनाचे पावित्र्य जपावे असे आवाहन माजी नगरसेविका मंगलताई मुद्गलकर यांनी केले आहे.

परभणी शहरातील प्रभाग १५ मधील जागृती हनुमान मंदिर जागृती कॉलनी येथे भाजपचे माजी जिल्हा अध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर, भाजपच्या माजी नगरसेविका तथा मनपा गटनेत्या, चिंतामणी मंडळ अध्यक्षा तथा भाजप ग्रामीण महिला समन्वयक छत्रपती संभाजीनगर मंगलताई मुदगलकर यांच्या संकल्पनेतून प्रभाग १५ मधील नागरिकांसाठी देवावर वाहिलेले फुले, हार आदी निर्माल्य संकलनासाठी वाहन तयार करण्यात आले आहे. या वाहनाचे लोकार्पण रविवारी करण्यात आले.

हे वाहन प्रभाग १५मध्ये फिरून निर्माल्य संकलन करणार असून प्रभागातील नागरिकांनी या वाहनामध्ये फक्त निर्माल्य टाकून याचे पावित्र्य राखावे असे आवाहन माजी नगरसेविका मंगलताई मुदगलकर यांनी केले आहे. या लोकार्पण सोहळ्यास भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष तथा उपनगराध्यक्ष अनिल मुदगलकर यांच्यासह प्रभागातील महिला, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button