क्रीडा

वाईट नजरेनं पाहतो…..ट्रॅक्टर ड्रायव्हरने मालकिणीचा खून केला

ट्रॅक्टर ड्रायव्हर म्हणून ठेवल्यानंतर मालकीणीकडेच वाईट नजरेनं पाहू लागल्यानंतर त्याला कामावरून काढून टाकले. मात्र, त्याने त्याच रागातून मालकिणीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur Crime) हातकणंगले तालुक्यातील (Hatkanangale) घुणकी या गावामध्ये घडला. सुषमा अशोक सनदे ( वय 45) असे त्यांचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी संशयित सुनील गणपती जाधव (रा. घुणकी, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) याच्या मुसक्या आवळल्या आहेत.. सुषमा या गुरुवार सकाळपासून बेपत्ता होत्या. घुणकीमधील डाग रस्त्याजवळील ऊसाच्या शेतात सुषमा यांचा मृतदेह आढळून आला. त्यानंतर एकच खळबळ उडाली.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार सुनील जाधव हा सनदे यांच्या ट्रॅक्टरवर चालक होता आणि त्याचबरोबर तो सराईत गुन्हेगार सुद्धा आहे. पुण्यामध्ये त्याच्याविरोधात अनेक ठिकाणी गुन्हे दाखल आहेत. त्यानेच हा खून केल्याचे स्पष्ट झाले.  सुषमा गुरुवारी गुरांना घेऊन चालण्यासाठी गेल्या होत्या. त्यामुळे त्या दिवसभरात परत न आल्याने शोध सुरू करण्यात आला. मात्र, त्यांचा ऊसाच्या फडामध्ये मृतदेह आढळून आला.

सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला होता

त्यानंतर सुषमा यांचे पती अशोक सनदे यांनी पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली. यावेळी संशयित म्हणून सुनीलविरोधात फिर्याद दिली. सनदे यांच्या ट्रॅक्टरवर दोन वर्षांपूर्वी सुनील हा ड्रायव्हर होता आणि त्यामुळे तो सुषमा यांच्याकडे वाईट नजरेने पाहू लागला होता. त्यामुळे त्याला कामावरून काढून टाकले होते. तेव्हापासून तोच राग त्याच्या मनामध्ये होता. याच रागातून त्याने हा खून केला.

Advertisements
Advertisements

पुण्यातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या

पोलिसांनी संशयिताचे नाव समोर आल्यानंतर तीन पथकांच्या माध्यमातून तपास सुरू केला. त्याचे मोबाईलचे शेवटचे लोकेशन नाशिकमध्ये दिसून आले. त्यानंतर तो काही वेळातच पुण्यातील शिवाजीनगर बसस्थानकावर येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथक पाठवून अटक करण्यात आली. सुषमा यांच्या पश्चात पती, दोन मुले, सासू, असा परिवार आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button