मुख्य बातमीराजकारण

अजित पवारांना अर्थ गृह नाही तर मिळणार हे खाते…संपूर्ण मंत्रिमंडळाची संभाव्य यादी आली समोर

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड आणि शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील झालेत. त्यांच्यासह त्यांच्या एकूण 9 आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली आहे. या मंत्र्यांना कोणती खाती दिली जाणार यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. मात्र, त्यापूर्वीच या मंत्र्यांना कोणती खाती मिळणार याची संभाव्य यादी समोर आली आहे.

अजित पवार यांच्या गटाला जी खाती मिळणार आहेत. त्याची संभाव्य यादी समोर आली आहे. अजित पवार यांना महसूल मंत्री खातं, दिलीप वळसे पाटील यांना सांस्कृतिक आणि कृषि खातं मिळणार असल्याची माहिती आहे. हसन मुश्रीफ यांना अल्पसंख्यांक, कामगार मंत्रीपद, तर छगन भुजबळ यांना ओबीसी आणि बहुजन विकास खातं, धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय खातं मिळणार असल्याची संभाव्य यादी समोर आली आहे. या बाबतचे वृत्त टीव्ही 9 मराठी या वृत्तवाहिनीने दिले आहे.

अजित पवार यांनी रविवारी राज्याचे नवे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील. हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव बाबा अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे आणि अनिल पाटील यांनीही पद आणि गोपनीयतेची शपथ घेतली.

Advertisements
Advertisements

शपथ घेतल्यानंतर आमदारांकडे कोणतं पद जाणार? अजित पवार यांना कोणतं खातं मिळणार? अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांना भाजपकडील खाते मिळणार की शिंदे गटाच्या खात्यांनाही डच्चू मिळणार? अशी चर्चा सुरू आहे. त्यानंतर आता अजित पवार यांच्या गटाला कोणती खाती मिळणार याची एक संभाव्य यादी समोर आली आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button