महाराष्ट्रराजकारण

प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही, मला वेगळा पर्याय शोधायचा होता; अशोक चव्हाणांची पहिली प्रतिक्रिया

अशोक चव्हाण  यांनी काँग्रेस पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि आमदाराकीचा राजीनामा दिला असून आपली राजकीय भूमिका येत्या एक दोन दिवसात जाहीर करेन असं ते म्हणाले. पक्ष सोडताना तसं कोणतंही कारण नाही, प्रत्येक गोष्टीचं कारण सांगता येणार नाही असं सांगत त्यांनी मला वेगळा पर्याय शोधायचा आहे, म्हणून राजीनामा दिल्याचं स्पष्ट केलं.

राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिल्यानंतर राज्यात एकच चर्चा सुरू झाली. अशोक चव्हाणांनी आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांकडे सोपवला असल्याची माहिती दिली. त्यानंतर आपण आतापर्यंत अनेक वर्षे काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम केलं आहे, आता नवा पर्याय शोधावा असं वाटतं अशं ते म्हणाले.

मी काँग्रेस पक्षाच्या विधानसभा सदस्यत्त्वाचा राजीनामा दिला आहे. काँग्रेस वर्किंग कमिटी, प्राथमिक सदस्यत्त्व विधिमंडळ काँग्रेस पक्ष राजीनामा दिला आहे. मी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे पक्षाचे काम केले आहे. माझी कोणाबद्दल वेगळी भावना नाही. जोपर्यंत काँग्रेसमध्ये होतो तोपर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. आता मी निर्णय घेईन, दिशा ठरवेन. एक दोन दिवसात राजकीय भूमिका ठरवेन.

Advertisements
Advertisements

भाजपची कार्यप्रणाली मला माहिती नाही. मी अद्याप भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला नाही. दोन दिवसांमध्ये मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करेन.

काँग्रेस पक्ष सोडण्याचं कारण काय असं विचारणा करण्यात आल्यानंतर अशोक चव्हाण म्हणाले की, प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे असे काही नाही. मी जन्मपासून आतापर्यंत काँग्रेसचे काम केले. आता मला वाटतं मला आता अन्य पर्याय पाहिले पाहिजेत. म्हणून मी पक्षाचा राजीनामा दिला.

यावेळी अशोक चव्हाण यांनी पक्ष सोडण्यामागील आपली भूमिकाही स्पष्ट केली. प्रत्येक गोष्टीला कारण असलंच पाहिजे, असे काही नाही. मी जन्मापासून आतापर्यंत काँग्रेस पक्षाचे काम केले आहे. आता मला वाटते की, मी अन्य पर्यायांचा विचार केला पाहिजे. त्यामुळे मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. आता मी विचार करुन पुढची दिशा ठरवेन. मी दुसऱ्या पक्षात जाण्याविषयी अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. येत्या दोन दिवसांमध्ये मी माझी पुढील राजकीय दिशा स्पष्ट करेल, असे अशोक चव्हाण यांनी सांगितले. तसेच मला कुठल्याही पक्षांतर्गत गोष्टीची वाच्यता  करायची नाही. मला कोणाचीही उणीदुणी काढायची नाहीत. तो माझा स्वभाव नाही, असेही चव्हाण यांनी म्हटले.

काँग्रेस पक्षाने तुम्हाला खूप काही दिले आहे, तरीही तुम्ही पक्ष का सोडताय, असा प्रश्न अशोक चव्हाण यांना विचारण्यात आला. त्यावर चव्हाण यांनी म्हटले की, अशोक चव्हाणांना पक्षाने खूप दिलं हे खरं आहे, पण चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केलंय. मी पक्षात असेपर्यंत प्रामाणिकपणे काम केले आहे. पक्षाने मला मोठं केलं असेल तर मीपण पक्षासाठी काही कमी केले नाही, असे अशोक चव्हाण यांनी आवर्जून सांगितले. विरोधी पक्षात असूनही राज्य सरकारने तुमच्या मतदारसंघातील कामांसाठी निधी दिला, यावर अशोक चव्हाण यांना विचारणा करण्यात आली. त्यावर स्पष्टीकरण देताना चव्हाण यांनी म्हटले की, मी राज्याचा मंत्री असताना भाजपसहित सर्वपक्षीयांना विकासाच्या कामात मदत केली. मंत्री शेवटी सर्व राज्याचा असतो, एका पक्षाचा नसतो. त्यामुळे माझ्या कार्यकाळात मी सर्वांना निधी दिला आहे, असे चव्हाण यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button