जगात जर्मनी

मुख्यमंत्री सचिवालय कक्ष परभणीत,वडदकर स्पेशल ऑफिसर; झटपट१० केसही निकाली काढल्या

आता जिल्हास्तरावरही मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित

जिल्हाधिकारी आंचल गोयल यांची पत्रकार परिषदेत माहिती

परभणी/प्रतिनिधी

Advertisements
Advertisements

ग्रामीण भागातील जनतेचे प्रश्न, शासनस्तरावरील कामे यासंदर्भात वेळोवेळी प्राप्त होणारी निवेदने, अर्जांवर जलद गतीने कार्यवाही व्हावी, तसेच प्रशासनात अधिकाधिक व प्रभावीपणे लोकाभिमुखता, पारदर्शकता व गतिमानता आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत. यासाठी जिल्हास्तरावर जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे क्षेत्रीय कार्यालय निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार परभणीच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सचिवालय कक्ष कार्यान्वित करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आंचल गोयल यांनी बुधवारी (दि.8) पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर, जिल्हा माहिती अधिकारी अरूण सुर्यवंशी यांची उपस्थिती होती. निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर हे मुख्यमंत्री सचिवालय कक्षाचे पदसिध्द विशेष कार्य अधिकारी असतील. तसेच एक नायब तहसीलदार व एक लिपीक हे या कक्षाचे काम पाहतील. सर्वसामान्य जनतेकडून मुख्यमंत्री यांना उद्देशून लिहिलेले दैनंदिन अर्ज, निवेदने, संदर्भ इत्यादी या कक्षामध्ये स्वीकारले जातील. जिल्ह्यातील जनतेला आपले अर्ज मुख्यमंत्री सचिवालय कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे सादर करता येतील. अर्धन्यायिक स्वरूपातील अर्ज व शासकीय कर्मचारी यांचे आस्थापना सेवेविषयी अर्ज या कक्षात स्वीकारले जाणार नाहीत, असेही जिल्हाधिकार्‍यांनी यावेळी स्पष्ट केले.
16 डिसेंबर 2022 रोजी शासनाच्या सुचना प्राप्त झाल्यानंतर परभणी येथे 22 डिसेंबरपासून या कक्षाचे काम सुरू करण्यात आले होते. त्यामध्ये प्राप्त 14 पैकी 10 प्रकरणे निकाली काढण्यात आल्याचे निवासी उपजिल्हाधिकारी वडदकर यांनी सांगितले.

असे असेल कामकाज

जे अर्ज, संदर्भ व निवेदने यावर जिल्हास्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, अशी प्रकरणे जिल्हास्तरावरील संबंधित विभाग प्रमुखाकडे वर्ग करुन त्यावर तातडीने कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच ज्या प्रकरणांमध्ये शासन स्तरावरुन कार्यवाही होणे अपेक्षित आहे, असे सर्व वैयक्तिक, धोरणात्मक अर्ज, संदर्भ व निवेदने मुंबई येथील मुख्यमंत्री सचिवालयाचे अपर मुख्य सचिव यांना सादर करण्यात येणार आहेत.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button