जगात जर्मनी

भव्य धम्म पदयात्रेचे मंगळवारी प्रस्थान; सोहळ्यानिमित्त बुद्ध अस्थिदर्शन, बुद्ध मूर्ती वाटप व धम्मदेसना संयोजक सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांची पत्रकार परिषद

भव्य धम्म पदयात्रेचे मंगळवारी प्रस्थान; सोहळ्यानिमित्त बुद्ध अस्थिदर्शन, बुद्ध मूर्ती वाटप व धम्मदेसना

संयोजक सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांची पत्रकार परिषदेत माहिती

परभणी/प्रतिनिधी

Advertisements
Advertisements

आंतरराष्ट्रीय बौध्द भिक्खू संघ, थायलंड येथील 110 भिक्खूंचा सहभाग असलेली देशातील पहिली धम्म पदयात्रा परभणी ते चैत्यभूमी, दादर मुंबईपर्यंत मंगळवारी (दि.17) प्रस्थान करणार आहे. या भव्य बौद्ध धम्म पदयात्रेचे काटेकोर नियोजन करण्यात आलेले आहे. या धम्म पदयात्रेचा भव्य प्रस्थान सोहळा मंगळवारी (दि.17) सकाळी 11.30 वा. ज्ञानोपासक महाविद्यालय मैदान, जिंतूर रोड, परभणी येथे आंतरराष्ट्रीय भिक्खू संघाच्या, प्रमुख अतिथी व मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे, अशी माहिती मुख्य संयोजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनु. जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष सिध्दार्थ हत्तीअंबिरे यांची पत्रकार परिषदेत यांनी दिली.
यावेळी मुख्य समन्वयक ज्येष्ठ नेते विजयराव वाकोडे, बौद्ध धम्म पदयात्रा समन्वय समितीचे डॉ.प्रकाश डाके, सेवानिवृत्त पोलीस निरीक्षक भीमराव शिंगाडे, डॉ.प्रकाश डाके यांची उपस्थिती होती. मंगळवारी (दि.17) सकाळी 8.30 वा.परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळयाला अभिवाद करून या धम्म पदयात्रेस प्रारंभ होईल व चौत्यभूमी, दादर मुंबई येथे दि. 15 फेब्रुवारी रोजी समारोप होईल. धम्म पदयात्रेचा मार्ग परभणी, जालना, औरंगाबाद, नाशिक – कल्याण- ठाणे – चैत्यभूमी दादर मुंबई असा आहे. थायलंड येथील 110 भिक्खूंसमवेत 570 स्थानिक नागरिकही या धम्म पदयात्रेत सहभागी होणार आहेत.
भव्य कार्यक्रमाचे उद्घाटक भंते लांगफुजी, (थायलंड), प्रमुख पाहुणे भंते भदंत सॉगसेन फँटफियन (थायलंड), भंते विचीयन अबोत (श्रीराजगीर, थायलंड), भंते डॉ.उपगुप्त महाथेरो, पूर्ण, बाबासाहेबांचे नातू भीमराव आंबेडकर, (राष्ट्रीय कार्याध्यक्ष बौद्ध महासभा), कॅप्टन कटकीत (थायलंड), सिरीलक मेथाई (थायलंड) प्रसिद्ध सिनेअभिनेते गगन मलिक आदि मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. या ऐतिहासिक सोहळयाचे मुख्य आकर्षण म्हणजे तथागत बुद्धांच्या थायलंड येथे जतन केलेल्या व ऐतिहासिक नोंद असलेल्या अस्थी विशेष राजदूतामार्फत भारतात पहिल्यांदाच येत आहेत, असे श्री.हत्तीअंबिरे यांनी सांगितले.अथक प्रयत्नातून हा पवित्र अस्थी कलश भारतात आणण्यात येत आहे. सर्वांनी पवित्र अस्थी – दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे. बुद्ध मूर्ती वाटप व आंतराष्ट्रीय भिक्खू संघाची धम्म देसना श्रवण करण्याचीही संधी मिळणार आहे. कार्यक्रमाचे उद्घाटक भंते लांगफुजी, (थायलंड) यांच्या हस्ते पंचशील ध्वज दाखवून व मान्यवरांच्या उपस्थितीत धम्म पदयात्रेचा शुभारंभ होईल, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button