महाराष्ट्र

बिबट्याने नवऱ्याची मानगुटी पकडली, बायको वाघीण झाली, कुंकवाच्या धन्याला मृत्यूच्या दाढेतून खेचून आणलं

पुणे (दौंड) : पुण्यातील दौंड तालुक्यातील नानगाव येथे शेतमजुर पतीला पत्नीने बिबट्याच्या तावडीतून सोडवले. या घटनेतून पुराणातील सत्यवानाला सावित्रीने दिलेल्या जीवदानाचा प्रत्यय परिसरातील नागरिकांना आला आहे. काशिनाथ बापू निंबाळकर (वय ५२) यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या पत्नी सरूबाई निंबाळकर (वय ४५) यांनी प्रतिहल्ला करत बिबट्याला परतवून लावल्याने त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दौंड तालुक्यातील भीमा नदीकाठी नानगाव गावात निंबाळकर राहतात. त्यांच्या घराभोवती ऊस आहे. काशिनाथ निंबाळकर हे रात्री साडेदहाच्या सुमारास घराबाहेर आले होते. याचदरम्यान बिबट्याने काशिनाथ यांच्यावर अचानक झडप घातली. बिबट्याने निंबाळकर यांची हनुवटी जबड्यात पकडली. अचानक झालेल्या या हल्ल्याने निंबाळकर मोठ्याने ओरडले. त्यांच्या आवाजाने त्यांची पत्नी सरुबाई व त्यांचा पाळीव कुत्रा त्यांच्या दिशेने धावून आले. काशिनाथ हे बिबट्याचा प्रतिकार करत असतानाच त्यांच्या कुत्र्याने बिबट्यावर झडप मारली आणि सरुबाई यांनी लाकडाने प्रहार करत बिबट्यावर हल्ला चढवला.

या हल्ल्यात बिबट्याला माघार घ्यावी लागली आणि काशिनाथ यांना सोडत बिबट्याने उसात धूम ठोकली. या हल्ल्यात निंबाळकर यांच्या हनुवटीला सहा टाके पडले आहेत. सध्या त्यांची प्रकृती सुधारत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. तर बायकोमुळेच मला जीवदान मिळाल्याचे निंबाळकर यांनी सांगितले. पतीवर बिबट्याचा हल्ला होत असल्याचे पाहून अंगाचा थरकाप उडाला होता. पण पतीचा जीव धोक्यात पाहून मागे हटले नाही. हातात लाकूड घेऊन बिबट्यावर हल्ला चढवला आणि पतीला संकटातून सोडवले, अशी प्रतिक्रिया सरुबाई निंबाळकर यांनी दिली.

Advertisements
Advertisements

बिबट्या वयाने लहान असल्याने सुदैवाने निंबाळकर यांची सुटका झाली आहे. घटनेचा पंचनामा केला असून लवकरच आर्थिक मदत केली जाईल. ग्रामपंचायतीचा ठराव आल्यानंतर पिंजरा मागणीचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवला जाईल, अशी माहिती वन अधिकारी कल्याणी गोडसे यांनी दिली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button