क्राईममहाराष्ट्र

बुटात मोबाईल, केसात ब्ल्यूटूथ, वनविभागाच्या परीक्षेतील प्रकार, हायटेक कॉपीचं बिंग फुटलं, एकाला बेड्या

सांगली : सांगलीत गुरुवारी झालेल्या वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरती परीक्षेत अतिशय चपळाईने कॉपी करणाऱ्या कॉपीबहाद्दराला पकडण्यात आले. वनविभागाच्या पथकाच्या निदर्शनास कॉपीचा प्रकार उघड झाल्यानंतर त्यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. कॉपी करणाऱ्या एकास अटक केली आहे. हा प्रकार गुरुवार दि. ०३ ऑगस्ट रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास एका परीक्षा केंद्रात घडला. या प्रकरणी युवराज पाटील यांनी विश्रामबाग पोलिसात फिर्याद दिली आहे. अविनाश संजनसिंग गुमलाडू (रा. शिवगाव) आणि अर्जुन रतन नार्डे (रा. संजरपूर जि. छत्रपती संभाजीनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकरणी अविनाश गुमलाडू याला अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरु असून यातून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, सांगली ते मिरज रोडवरील वसंतदादा पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडी अँड रिसर्च या कॉलेज मध्ये वनविभागाच्या शिपाई पदासाठीच्या भरतीचा पेपर गुरुवार दि. ०३ ऑगस्ट रोजी होता. दुपारच्या सुमारास पेपर सुरु झाल्यानंतर संशयित अविनाश गुमलाडू हा त्याच्या बुटामध्ये मोबाईल लपवून ठेऊन केसातून मोबाईल ब्ल्यूटुथ हेडफोन लपवून कॉपी करत पेपर लिहीत होता.

मोबाईलवरून छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दुसरा संशयित अर्जुन नार्डे हा उत्तरे देत होता. यावेळी याठिकाणी असणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास सदरची बाब येताच त्यांनी अविनाश याची कसून तपासणी केली असता त्याच्याकडे मायक्रोफोन, मोबाईल, सॅंडल जोड, डिव्हाईस असा ३ हजार ४५० रुपयांचा मुद्देमाल आढळला. यानंतर दोघांना विश्रामबाग पोलिसांच्या स्वाधीन केले.

Advertisements
Advertisements

पोलिसांनी संशयित गुमलाडू यांच्याकडे कसून चौकशी केली असता सदरचा मोबाईल आणि डिव्हाईस हे नार्डे याने दिले असून पेपर सुरु झाल्यानंतर तो याद्वारे उत्तरे देत असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्याकडून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला. या दोघांविरोधात परीक्षांमध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यान, संशयित नार्डे याने अशा अनेक परीक्षेत अनेक उमेदवारांना कॉपी करून देत शासकीय नोकऱ्या मिळवून दिल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यादृष्टीने तपास सुरु असल्याचं पोलिसांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button