पाथरी

संपादक-मुख्याध्यापक मुलाखतीतून विद्यार्थ्यांनी गिरवले पत्रकारीतेचे धडे

पाथरी : पत्रकारितेची ताकत, संपादकांचे कार्य, प्रमुख पाहुण्यांची उत्तर देण्याची शैली इत्यादी विद्यार्थ्यापर्यंत पोहचावे यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा लोणी (बु) येथे आदर्श शाळेचे मुख्याध्यापक सुभाष चिंचाने यांची मुलाखत घेण्यात आली. यात मुख्य संपादिकांची भूमिका सातवी इयत्तेतील कु.धनश्री गिराम या विद्यार्थिनीने पार पाडली. चर्चासत्र कार्यक्रमाचे डायरेक्टर म्हणून वर्गशिक्षक गायकवाड यांनी योग्य नियोजन केले. कॅमेरामॅनची भूमिका सय्यद यांनी तर गणेश शिंदे यांनी निरीक्षकांची भूमिका पार पाडली.

मुलांना प्रत्यक्षात पत्रकारीतेचा अनुभव देण्याच्या उद्देशाने वर्गशिक्षक गायकवाड यांनी शाळेमध्ये मुलाखतीचा कार्यक्रम घडवून आणला. मुलांनी देखील अगदी भरभरून प्रतिसाद दिला. मुख्याध्यापक चिंचाणे यांना प्रश्न उत्तर विचारताना विद्यार्थिनी धनश्री गीराम हिने अतिशय आत्मविश्वासाने प्रश्न विचारले. त्याला विद्यार्थ्यांना पचनी पडतील या शब्दात उत्तरेही मुलांना ऐकायला मिळाली. एक ते चार वर्ग असलेल्या शाळेपासून सुरुवात झालेला चिंचाणे यांचा शिक्षण सेवक ते पुढे जिल्ह्यात सर्वात जास्त पटसंख्या असणा-या आंतरराष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक पर्यंतचा प्रवास मुलांना ऐकायला मिळाला. या मुलाखत सत्रात सर्व शाळेचे विद्यार्थ्यांनी सहभाग घेतले. सोबतच शाळेतील वरील शिक्षकांसह नेताजी वागाळे, श्यामसुंदर बगाटे, राणी पवार, स्वाती धर्मे व मल्लिकार्जुन देवरे यांनी देखील प्रेक्षक म्हणून संपूर्ण मुलाखतीचे आनंद घेतला.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.
Back to top button