परभणीपालम

पोलिस दलात निवड झाल्याबद्दल गंगाधर साबने यांचा सत्कार

पालम : तालुक्यातील तांदुळवाडी येथील गंगाधर रामराव साबने यांची मुंबई पोलिस भरतीमध्ये निवड झाली आहे. त्यांचा पालम येथे शुक्रवार, दि.११ रोजी सत्कार करण्यात आला. अथक परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि समर्पण त्यांच्या यशाचे गमक ठरले. सत्कार प्रसंगी शिवसेना शिंदे गटाचे युवा नेते शांतीस्वरूप जाधव, ग्रामविकास अधिकारी राजकुमार हिंगे, भूविकास बँकेचे वसुली अधिकारी नारायण ताल्डे, सरपंच बी.बी. लांडे, तांदुळवाडीचे सरपंच साधू हाके, उपसरपंच विजय साबने, ग्रा.पं. सदस्य मिथाजी नरवड, वैभव साबने, रंगनाथ वाघमारे, ऋषिकेश वाघमारे, सचिन माने, दत्ता धुळगुंडे, रघुनाथ साबने, आनंद साबने आदी उपस्थित होते.

साबने यांनी कोणत्याही प्रशिक्षणाविना यश संपादन केले. त्यांची आर्थिक परिस्थीती बेताची आहे. त्यांच्या कुटुंबाची उपजिवीका मजुरीवर चालते. त्यांनी परिस्थीतीची जाणीव ठेवली. शिवाय मुलगा पोलिसांत भरती व्हावा, ही आई आणि वडिलांची तीव्र ईच्छा होती. त्यांच्या स्वप्न साकार होण्यासाठी गंगाधर यांनी अविरत परिश्रम घेतले. म्हणून कष्टाचे चिज झाल्याने आई-वडिलांचा आनंद गगणात मावेनासा झाला आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button