परभणी

शेतक-यांनी रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर टाळावा

परभणी : वसुंधरेच्या संरक्षणासाठी शेतक-यांनी अमर्याद रासायनिक खते व किटकनाशकांचा वापर टाळून जैविक खते व जैविक किटकनाशकांचा शेतीत वापर केल्यास प्रदूषण कमी होऊन शेतीची सुपिकता वाढेल. किटकनाशकांमुळे होणारे विविध दुर्धर आजारांना आळा बसेल. त्याचबरोबर शेतक-यांना फायदेशीर असलेले मित्र किटकांना संरक्षण मिळून पिकांचे उत्पादकता वाढेल तसेत शेतक-यांच्या खर्चातही बचत होईल, असे प्रतिपादन वसंराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या किड नियंत्रण विभागाचे प्रा. डॉ. दिंगबर पटाईत यांनी केले.

केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्या वतीने दि.२२ एप्रिल रोजी कात्नेश्वर येथे जागतिक वसुंधरा दिनानिमित्त विशेष प्रचार कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी प्रा.डॉ.पटाईत बोलत होते. या प्रंसंगी सरपंच कान्होपात्रा चापके, क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक राजू पांचाळा, सामाजिक कार्यकर्ते शेषराव चापके व चंद्रकांत चिपके व सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी सुमित दोडल, दूरदर्शनचे प्रतिनिधी सूदर्शन चापके आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना प्रा.डॉ.पटाईत म्हणाले की, पर्यावरणाचे संतूलन राखण्यात शेती क्षेत्राचा मोठा वाटा आहे. रासायनिक खतांऐवजी शेंद्रीय आणि शेण खताचा वापर वाढवला तरच शेतीतील सूपीकता टिकून राहील अन्यथा शेतीची उत्पादन क्षमता घटेल असे प्रा.डॉ.पटाईत यांनी सांगितले.

Advertisements
Advertisements

या वेळी क्षेत्रीय प्रचार अधिकारी माधव जायभाये यांनी पर्यावरणाचे संतूलन आणि संरक्षणासाठी केंद्र सरकार करत असलेल्या उपायोजनांची माहिती दिली. स्वच्छता, प्लास्टीकचा वापर टाळून त्याऐवजी कापडी पिशव्या वापर, वृक्ष लागवड व जीवनशैलीत बदल करून पर्यावरणाला हाणी पोहोचनार नाही याची प्रत्येत नागरीकांनी काळजी घेतली पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी शाहीर विजय सातोरे यांनी आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमातून पर्यावरणाचे महत्व विषद करुन मनोरंजनाच्या माध्यमातून जनजागृती केली. तत्पुर्वी जागतिक वसूंधरा दिनानिमित्त चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात गावातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. गावात जनजागृती रॅली काढण्यात आली. या रॅलीत विद्यार्थी आणि ग्रामस्थ सहभागी झाले होते. मान्यवरांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांचा पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन सूमित दोडल यांनी तर आभार राजू पांचाळ यांनी मानले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button