मराठवाड़ा

तीन अपत्ये असलेल्या अंबड तहसीलदार यांच्या वर कारवाई कधी ?

आम्ही वाचक प्रतिनिधी/छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्य  सरकारने 2005 नंतर दोन पेक्षा जास्त अपत्यांना जन्म देणाऱ्यांना शासकीय सेवेत आणि निवडणूकीत बंदी घालण्यात आली असून मात्र, या नियमाला अंबड तहसीलदार  शेळके  यांनीच हरताळ फासली आहे. तिसरे मूल लपविल्या प्रकरणी तहसिलदार शेळके यांना  बडतर्फ तर  करण्यात आलेच  नाही . तसेच अनिता नितीन पाटील वानखडे    . पैठण यांनी तहसिलदार विरुध्द महसूल मंत्री, अप्पर मुख्य सचिव,विभागीय आयुक्त  यांचेकडे त्यांना दोन पेक्षा अधिक मुले असल्याने त्यांची  चौकशी करून त्यांच्यावर फसवणूकीचा गुन्हा दाखल करावा , अशी तक्रार केली असून त्यावर  खुलासा सादर करतांना अंबड तहसिलदार शेळके यांनी माझी महाराष्ट्र लोकसेवा आयोगा मार्फत नायब तहसिलदार संवर्गात दिनांक ०५/०८/२००४ रोजी नियुक्ती झालेली आहे .

सदरचा अधिनियम २८ मार्च २००५ पासून लागू झाला आहे . सदर अधिनियमातील नियम ५ नुसार सदरचा अधिनियम मला लागू होत नाही . मला तीन अपत्ये आहेत , ही बाब सत्य आहे . त्यांची नावे खालील प्रमाणे आहे .  मानसी चंद्रकांत शेळके , जन्म वर्ष 2000, मनस्वी चंद्रकांत शेळके , जन्म वर्ष 2005   दक्ष चंद्रकांत शेळके , जन्म वर्ष 2011, दोन अपत्यांची नियमावली पायदळी तुडवत अंबड तहसिलदार शेळके यांनी नव्या नियमांचा पाया घातल्याची चर्चा  परिसरात रंगली आहे.  महाराष्ट्र  लोकसेवा आयोगामार्फत  शेळके यांची नायब तहसिलदार पदी  2004 साली   नियुक्ती झाली आहे  नायब तहसिलदार म्हणुन शेळके  यांची निवड झाली होती.    शासनाच्या प्रत्येक शासन परिपञकाची अंमलबजावणी करणे हे शासकिय कर्मचारी व अधिकारी यांना बंधनकारक असताना अनिता वानखडे यांच्या  तक्रारीनंतर  शेळके यांचे बिंग फुटले  माञ शेळके यांना  बडतर्फ करुन  त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश  शासनाने अजुन दिलेले नाहीत त्यामुळे शेळके यांच्यावर कारवाई करण्याबाबत महसूलमंत्री यांची उदासीनता दिसून येत असल्याने आता राज्यपाल यांना अंबड तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांच्या वर कारवाई करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले आहे लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी यासाठी बेदमुदत उपोषण देखील करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.

Advertisements
Advertisements

हेच का सर्वसामान्य जनतेचे सरकार

मंत्रालय मधील अधिकारीच नियमानुसार काम करत नसतील तर न्याय मागायचा कुणाला हा प्रश्न निर्माण झाला आहे   महसूल मंत्री हे त्यांच्या खात्यात  लक्ष देत नसल्याने एकीकडे जनतेचे सहकार असे सांगितले जाते दुसरीकडे जातीचे प्रमाणपत्र खोटे असणारे तहसीलदार दत्ता निलावड, उत्तम निलावड असो किंवा भ्रष्टाचार करणार्या शेतकरी वर्गाला महिलांना उध्दट बोलणारे, वाळू माफियांना सहकार्य करणारे ,तहसील कार्यालय खाजगीकरण करणारे ,तीन अपत्ये असणारे , कोवीड असताना देखील पावत्या वर सह्या करणारे , दप्तरी कोणतीही नोंद नसुन लाखो रुपये डिझेल च्या नावाने उचलेले अंबड तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांच्या वर कारवाई करून  तक्रार वेळेत निकाली काढण्यात येत नाही
मी योग्य तो न्याय मिळवून घेण्यासाठी राज्यपालांना निवेदन देण्यात आले असून  वेळप्रसंगी लोकशाही मार्गाने राज्यपालासमोर बेदमुदत आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला तरी चालेल

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button