क्रीडामुख्य बातमी

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिकेवर 78 धावांनी विजय, 2-1 ने मालिका जिंकली

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेवर तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात 78 धावांनी विजय मिळवला आहे. टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी 297 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र टीम इंडियाच्या गोलंदाजांनी दक्षिण आफ्रिकेला 45.5 ओव्हरमध्ये 218 धावांवर गुंडाळलं. दक्षिण आफ्रिकेकडून टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81 धावा केल्या.  भारतीय गोलंदाजांसमोर टोनी डी झोर्झीशिवाय एकालाही टिकता आलं नाही.  अर्शदीप सिंह,  संजू सॅमसन आणि तिलक वर्मा,  हे तिकडी टीम इंडियाच्या विजयाची शिल्पकार ठरली. तर इतरांनीही चांगलं योगदान दिलं.  टीम इंडियाने या विजयासह 3 सामन्यांची मालिका ही 2-1 ने जिंकली आहे.

दरम्यान त्याआधी दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून टीम इंडियाला बॅटिंगसाठी भाग पाडलं. टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही.काही विकेट्स गमावल्यानंतर मधल्या फळीत संजू सॅमसन, तिलक वर्मा आणि रिंकू सिंह या तिघांनी टीम इंडियासाठी निर्णायक भूमिका बजावली. संजू सॅमसन याने पहिलंवहिलं शतक तर तिलक वर्मा याने पहिलंवहिलं अर्धशतक लगावलं. तर रिंकू सिंह याने फिनिशिंग टच दिला.

टीम इंडियाकडून संजूने 108 आणि तिलकने 52 धावांची खेळी केली. तर रिंकूने अखेरी येऊन 38 धावा केल्या. या तिघांशिवाय रजत पाटीदार याने 22, कॅप्टन केएल याने 21 आणि साई सुदर्शनने 10 धावा केल्या. या व्यतिरिक्त इतरांना विशेष काही करता आलं नाही. टीम इंडियाने अशाप्रकारे 50 ओव्हरमध्ये 8 विकेट्स गमावून 296 पर्यंत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेकडून ब्यूरन हेंड्रिक्स याने 3 विकेट्स घेतल्या. नांद्रे बर्गर याला 2 विकेट्स मिळाल्या. तर लिझाद विल्यम्स, विआन मुल्डर आणि केशव महाराज या तिघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

Advertisements
Advertisements

दक्षिण आफ्रिकेकडून ओपनर टोनी डी झोर्झी याने सर्वाधिक 81, रिझा हेंडीक्स 19, रॅसी व्हॅन डर ड्युसेन 2, कॅप्टन एडन मारक्रम 36 आणि हेनरिक क्लासेन याने 21 धावा केल्या. डेव्हिड मिलर याने 10, केशव महाराज याने 14 आणि ब्यूरन हेंड्रिक्स याने 18 धावांचं योगदान दिलं. नांद्रे बर्गर 1 वर नाबाद परतला. तर तिघांना 2 पेक्षा अधिक धावा करता आल्या नाहीत. टीम इंडियाकडून अर्शदीप सिंह याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. आवेश खान आणि वॉशिंग्टन सुंदर या दोघांनी प्रत्येकी 2-2 विकेट्स घेतल्या. तर मुकेश कुमार आणि अक्षर पटेल या दोघांच्या खात्यात 1-1 विकेट गेली.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button