महाराष्ट्रराजकारण

देशातील जनता सगळं पाहतेय, सरकारला किंमत मोजावी लागेल; शरद पवार

विरोधकांना नजरअंदाज करुन सरकार कारभार करु पाहत आहे. देशातील जनता सगळं पाहत आहे, सरकारला याची किंमत मोजावी लागेल असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांनी सरकारवर जोरदार टीका केली. संसदेच्या कामाकाजावेळी विरोधी पक्षांच्या 144 खासदारांचं निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी दिल्लीत सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येत सरकार विरोधात मोर्चा काढला. यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे दखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी सरकारवर टीका केली.

खासदारांची एकच मागणी होती की, चार पाच दिवसापूर्वी जे लोक संसदेत घुसले. ते लोक संसदेचे सदस्य नव्हते. ते सभागृहात कसे आले? त्यांना पास कोणी दिला? यावर सभागृहात चर्चा होणं गरजेचं आहे. याबाबतची मागणी विरोधकांनी केली होती. यावर सरकारकडून उत्तर अपेक्षीत होतं असे शरद पवार म्हणाले.  पण सरकारनं याबाबत काही उत्तर दिलं नाही. याउलट याबाबत चर्चेची मागणी करणाऱ्या खासदारांचे निलंबन केल्याचे शरद पवार म्हणाले. आजपर्यंत संसदेत असं कधी घडलं नव्हते असेही शरद पवार म्हणाले.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button