क्राईमदेश -विदेशमुख्य बातमी

धीरज साहूंनी आणखी पैसा भिंतीत, जमिनीत लपवल्याची शक्यता

काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू  यांच्या घरासह मालमत्तांवर तब्बल सात दिवस आयकर विभागाकडून छापेमारी करण्यात आली. साहू यांच्या मालमत्तांवरील धाडीला इतिहासातील सर्वात मोठी धाड असं संबोधलं जात आहे. धीरज साहूंच्या घराच्या कानाकोपऱ्यातून भली मोठी रोकड जप्त करण्यात आली. रोकड एवढी मोठ्ठी होती की, रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांच्या नाकी नऊ आले. नोटांची बंडलं मोजण्यासाठी आयकर विभागाला बँकेच्या कर्मचाऱ्यांची मदत घ्यावी लागली. नोटा मोजताना मशीनही थकल्या आणि बंद पडल्या.

धीरज साहूंच्या घरातून 351 कोटींची रोकड जमा करण्यात आली. सध्या या धाडीची देशभरात चर्चा आहे. तसेच, राजकीय वर्तुळातही आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. अशातच एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. धीरज साहुंच्या घरात आणखी रोकड लपवून ठेवलेली असल्याचा संशय आहे. आयकर विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धीरज साहू यांच्या घराती आणि कार्यालयांची पुन्हा झडती आयकर विभाग घेणार आहे. यासाठी आयकर विभाग अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करण्याची शक्यता आहे. धीरज साहूंच्या घराच्या भिंती आणि आसपासचा परिसर, कार्यालय आणि इतर ठिकाणांची आयकर विभाग जिओ सर्व्हिलन्स सिस्टिमद्वारे झडती घेणार आहे.

आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं की, त्यांनी केवळ आपल्या घरात आणि कार्यालयातच नव्हे तर त्यांच्या आलिशान घराच्या भिंतींमध्येही नोटा आणि इतर मौल्यवान वस्तू दडवून ठेवल्या आहेत. याचाच तपास करण्यासाठी आता आयकर अधिकारी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेणार आहेत. त्यांच्या घराच्या भिंती आणि मैदान, ऑफिस आणि इतर ठिकाणांवरही जिओ सर्व्हिलन्स सिस्टीमद्वारे नजर ठेवली जाणार असल्याचं आयकर विभागाच्या सूत्रांनी सांगितलं.

Advertisements
Advertisements

घराच्या आसपासच्या परिसरातील माती खणून त्याखाली त्यांनी आपली संपत्ती लपवली का? असा संशय आयकर विभागाला पडला आहे. तसेच, भितींच्या आतमध्येही रोकड आणि इतर मौल्यवान ऐवज लपवल्याचा संशयही आयकर विभागानं व्यक्त केला आहे. याव्यतिरिक्त आयकर विभागाला केवळ संशय नाहीच, तर त्याबाबतचे बक्कळ पुरावे त्यांच्याकडे असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यामुळेच आता जिओ सर्व्हिलन्स सिस्टिमची मशीन घेऊन आयकर अधिकारी पोहोचले आहेत. हे यंत्र जमिनीत आणि भिंतींमध्ये दडलेली संपत्ती शोधण्यात सक्षम आहे.

धीरज साहू यांच्या घरातून आणि कंपनीतून तब्बल 354 कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 300 कोटी रुपये एकट्या बालनगीरच्या दारू कंपनीच्या कार्यालयातून जप्त करण्यात आले आहेत. जवळच त्यांचा वडिलोपार्जित वाडा आहे. साहू कुटुंबानं हा वाडा 1954 मध्ये बांधला होता, आता तो वाडा जीर्ण झाला आहे. विनायक मिश्रा हे साहू कुटुंबाच्या वाड्याशेजारीच राहतात. साहू कुटुंबाच्या दारू व्यवसायाबाबत उत्पादन शुल्क विभागाकडे वर्षानुवर्ष तक्रारी करण्यात आल्या आहेत, मात्र कोणतीही कारवाई करण्यात आली नसल्याचं त्यांनी सांगितलं. विनायक मिश्रा यांनी सांगितलं की, त्यांनी ऑक्टोबर 2021 मध्ये आरटीआय दाखल केला होता.

राजेश साहू हे बुद्धिस्ट डिस्टिलरी प्रायव्हेट कंपनीचे व्यवस्थापक असून त्यांच्याकडून 285 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. दुसरा शेजारी सिद्धार्थ मिश्रा असून तो व्यवसायानं वकील आहे. तो साहू यांच्या वाड्याशेजारी राहतो. शेजारच्या साहूंच्या साम्राज्याबाबत काळ्या धंद्याबद्दल इथल्या लोकांना चांगली माहिती होती, पण आता संपूर्ण देशाला त्याची माहिती झाली आहे, असं त्यानं सांगितलं.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button