क्राईमदेश -विदेशमुख्य बातमी

नितीन गडकरी यांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी, दिल्लीत खळबळ

नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना फोन कॉलवर धमकी आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी त्यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आलीय. अज्ञात आरोपींनी फोन करुन नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आहे. विशेष म्हणजे नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्याची ही तिसरी वेळ आहे. याआधी देखील नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी काही आरोपींना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आलेली. पण त्यानंतरही पुन्हा तसाच प्रकार समोर येताना दिसत आहे. गडकरींना पुन्हा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, नितीन गडकरी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी फोन कॉलवर धमकी देण्यात आली. संबंधित प्रकरण गंभीर असल्याने गडकरी यांनी तातडीने दिल्ली पोलिसांना याबाबत माहिती दिली. नितीन गडकरी यांच्यासारखे दिग्गज आणि केंद्रीय कॅबिनेट मंत्री असलेल्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी कशी दिली जाऊ शकते? अशी चर्चा आता जोर धरु लागली आहे. दिल्ली पोलिसांनी संबंधित प्रकरण गांभीर्याने घेतलं आहे.

दिल्ली पोलिसांकडून या प्रकरणी चौकशी सुरु आहे. दिल्ली पोलीस फोन कॉलची चौकशी करत आहेत. पोलीस आरोपींना लवकर बेड्या ठोकतील, अशी आशा व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी आरोपींना लवकर पकडून त्यांना योग्य शिक्षा द्यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. दरम्यान, नितीन गडकरी यांना याआधीदेखील धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गडकरी यांना सातत्याने मिळणाऱ्या धमक्यांचं नेमकं कारण काय? असा प्रश्न उपस्थित होतोय. पोलिसांचा या प्रकरणी तपास सुरु आहे.

Advertisements
Advertisements

नितीन गडकरी यांना जानेवारी महिन्यात आली होती पहिली धमकी

नितीन गडकरी यांना जानेवारी महिन्यात पहिली धमकी आली होती. त्यानंतर मार्च महिन्यात नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात धमकीचे 3 फोन आले होते. धमकी देणाऱ्या आरोपींनी 10 कोटींच्या खंडणीची मागणी केली होती. तसेच धमकी देणाऱ्या आरोपीने स्वत:चं नाव जयेश पुजारी असल्याचं म्हटलं होतं.

नितीन गडकरी यांना 14 जानेवारीला धमकीचा सर्वात पहिला फोन आला होता हा फोन बेळगाव तुरुंगात गडकरी यांच्या कार्यालयात आला होता. धमकीवेळी आरोपीने स्वत:चं नाव जयेश पुजारी असं सांगितलं होतं. त्यानंतर दोन महिन्यांनी आलेल्या 3 धमक्यांच्या फोनमध्येही धमकी देण्यात आली आणि जयेश पुजारी असंच नाव सांगण्यात आलं.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button