देश -विदेशमुख्य बातमी

रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसा, वडोदरा येथे शोभायात्रेवर दगडफेक

नवी दिल्लीः ऐन रामनवमीच्या दिवशी गुजरातमध्ये हिंसा भडकली होती. वडोदरा शहरात आयोजित शोभायात्रेवर दगडफेक करण्यात आली. या घटनेनंतर शहरात तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. पोलिसांनी तातडीने अॅक्शन घेत परिस्थिती नियंत्रणात आणली.

 

आज रामनवमीनिमित्त वडोदरा शहरातून शोभायात्रा निघाली होती. फतेपुरा गराना पोलिस चौकीजवळ अचानक शोभायात्रेवर दगडफेक सुरु झाली. त्यानंतर दोन्ही गट एकमेकांवर दगडं फेकू लागले. घटनास्थळी पोलिस पोहोचल्याने पुढील अनर्थ टळला.

या घटनेमध्ये कुणीही जखमी नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. या घटनेनंतरही शोभायात्रा पुढे निघाली. कुठलीही तोडफोड येथे झाली नाही. पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती चिघळली नाही.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button