महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

लोकसभा, विधानसभा निवडणुका एकाच वेळी लागणार?

राज्यात अनेक जेष्ठ नेत्यांनी मध्यवर्ती निवडणुका लागण्याची शक्यता वर्तवली आहे. तर काहीनी देशात लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकाच वेळी होऊ शकतात अशी चर्चा असतानाच आता यावर राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी उत्तर दिले असून ते म्हणाले, दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यास प्रशासन सज्ज आहे.

तर श्रीकांत देशपांडे हे निवडणुकीच्या पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी भंडाऱ्यामध्ये आले होते यावेळी त्यांनी ही माहिती दिली. दरम्यान निवडणुकीच्या पूर्व तयारीच्या अनुषंगाने ते आढावा घेण्यासाठी श्रीकांत देशपांडे राज्याच्या दौरा करत आहे. त्यांनी दौऱ्याला विदर्भातून सुरू केली आहे, ते आढावा घेण्यासाठी भंडारा येते आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

यावेळी देशपांडे म्हणाले की, कोणतीही निवडणूकीची तयारी महिनाभरात पुर्ण होत नाही. तर त्यासाठी खुप वेळ लागतो. त्यामुळे पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकांच्या घेण्याच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी आणि निवडणूक यंत्रणेची माहिती घेण्यासाठी दौरा सुरू आहे.

Advertisements
Advertisements

तर त्यांनी यावेळी मोठी माहिती दिली ते म्हणाले, २०२४ मध्ये लोकसभा आणि विधानसभा या दोन्ही निवडणुका होणार आहेत. या दोन्ही निवडणुका एकत्र घेण्यासाठी निवडणूक आयोग आणि प्रशासन सज्ज आहे. त्यामुळे आता देशातील राजकीय पक्ष निवडणुकांच्या तयारीला लागण्याची शक्यता आहे.

दरम्यान महाराष्ट्रातील राजकीय परस्थिती पाहता अनेक नेत्यांनी राज्यात मध्यावधी निवडणुका कधीही होऊ शकतात. अशी शक्यात वर्तवली होती. यामध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, विरोधी पक्ष नेते अजित पवार अशा अनेक नेत्यांनी ही शक्यता वर्तवली होती.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button