जगात जर्मनीताज्या बातम्यादेश -विदेशपरभणीमहाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदलीची चर्चाच चर्चा !

गावडे आऊट; चव्हाण ईन !

परभणी :

मुंबई येथील मुद्रांक शुल्क विभागाचे अतिरिक्त नियंत्रक संजयसिंग चव्हाण यांची परभणीच्या जिल्हाधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. येथील जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांची राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने आज मुंबईस तडकाफडकी बदली केली. या बदली मागचे नेमके कारण समोर आले नसले तरीही पर्दे की पीछे असलेल्या बदलीमागच्या कारणांची सर्वसामान्यांमध्ये जोरदार चर्चा आहे.

श्री.गावडे यांना बुधवारी सकाळी या बदली संदर्भातील आदेश प्राप्त झाला. गावडे यांची मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे. बदलीचे ठिकाण कळाले नाही.
चव्हाण यांच्या बदली संदर्भात सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव संजय उमराणीकर यांनी या आदेश काढला.

दरम्यान, नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण हे एमपीएसीमधून १९९३ साली उपजिल्हाधिकारी म्हणून रुजू झाले. ते मुळचे भोळी ( ता.खंडाळा, जि.सातारा) येथील आहेत. कायद्याचे पदवीधर असलेल्या श्री.चव्हाण यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज, इचलकरंजी येथे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच पुणे येथे रोजगार हमी योजना उपजिल्हाधिकारी, जिल्हा पुनर्वसन अधिकारी, प्रांताधिकारी, शेती महामंडळ मुख्य प्रशासन अधिकारी म्हणून काम केले आहे. पुणे विभागीय आयुक्‍त कार्यालयात सामान्य प्रशासनचे उपायुक्‍त म्हणूनही कामाचा त्यांचा अनुभव आहे.

दरम्यान, परभणीला प्रमोटी नको, तर थेट आयएएस अधिकारी जिल्हाधिकारी म्हणून द्यावा अशी मागणी आज युवक कॉंग्रेसच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या संदर्भात युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमोल जाधव यांनी निवेदन दिले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button