मराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमी

मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी निर्णय घेतील

छत्रपती संभाजीनगर : राज्यात रविवारी आणि सोमवारी काही ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे. या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकाचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहे.

तसेच, नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे कृषिमंत्री अब्दुल सत्तार हे सोमवारी रात्री घोसला (ता. सोयगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर) प्रसार माध्यमांशी बोलतांना म्हणाले.

गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने जिल्ह्ययासह राज्यात काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button