मराठवाड़ामहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

रश्मी ठाकरे आणि उद्धव ठाकरे ठाण्यात जाणार

उद्धव ठाकरे  आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आज ठाण्याला जाणार आहेत. ठाण्यात मारहाण झालेल्या ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशनी शिंदे यांची ते भेट घेणार आहेत. शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे जखमी झाल्या असून त्यांच्या उपचार सुरु आहेत. त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यात उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे ठाण्याला जाणार आहेत. त्यांच्यासोबत आदित्य ठाकरे देखील उपस्थित असतील. दरम्यान रोशनी शिंदे यांची तब्येत सध्या स्थिर असल्याचं कळतं.

ठाकरे गटाच्या पदाधिकारी रश्मी शिंदे यांना सोमवारी (3 एप्रिल) मारहाण झाली होती. शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप होत आहे. या मारहाणीत रोशनी शिंदे यांना दुखापत झाली असून त्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. या प्रकरणाची दखल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी घेतली आहे. रोशनी शिंदे यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी उद्धव ठाकरे हे पत्नी रश्मी ठाकरे यांच्यासह ठाण्याला जाणार आहेत. दुपारी एकच्या सुमारास दोघेही ठाण्यात पोहोचून रोशनी शिंदे यांची भेट घेतील असं समजतं.

मुख्यमंत्र्यांची पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक

दुसरीकडे ठाकरे आणि शिंदे गटात झालेल्या राड्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी आनंदाश्रमामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. तब्बल दोन तास ही बैठक सुरु होती मुख्यमंत्र्यांकडून कालच्या राड्याबाबतची इंत्यंभूत माहिती घेण्यात आली.

Advertisements
Advertisements

अद्याप गुन्हा नाही

या प्रकरणी अद्याप गुन्हा दाखल झालेला नाही. पोलिसांनी तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिल्याचा दावा खासदार राजन विचारे यांनी म्हटलं होतं. गुन्हा दाखल व्हावा यासाठी ठाकरे गटाचे कार्यकर्ते पोलीस स्टेशनच्या बाहेर जमा झाले आहेत. या प्रकरणावरुन आता ठाकरे विरुद्ध शिंदे असा वादही समोर येत आहे.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button