महाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

रोशनी शिंदे यांना मुका मार, गंभीर इजा नाही, त्या गर्भवतीही नाहीत

“रोशनी शिंदे  यांना गंभीर इजा झालेली नाही. त्यांना मुका मार आहे. अंतर्गत रक्तस्राव झालेला नाही. तसंच त्या गर्भवती  नाहीत, त्यांची प्रकृती स्थिर आहे,” अशी माहिती त्यांच्या उपचार करणारे डॉ. उमेश आलेगावकर यांनी दिली आहे. ठाकरे गटाच्या पदाधिकारी रोशन शिंदे यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 24 तास देखरेख करण्यासाठी त्यांना आयसीयूमध्ये दाखल केल्याचं डॉ. आलेगावकर यांनी सांगितलं.

ठाण्यात सोमवारी संध्याकाळी मोठा राडा झाला. यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) महिला कार्यकर्त्यांनी रोशनी शिंदे यांना मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मारहाण झालेल्या रोशनी शिंदे या गर्भवती असल्याच शक्यताही वर्तवली जात होती. परंतु रोशनी शिंदे यांची काल रात्री आणि आज सकाळी केलेली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. त्या गर्भवती नाहीत, असं डॉ. उमेश आलेगावकर यांनी स्पष्ट केलं.

मुका मार आहे, रक्तस्राव नाही : डॉक्टर

डॉक्टरांच्या माहितीनुसार, “काल रात्री साडेदहाच्या दरम्यान रोशनी शिंदे यांच्या नातेवाईकांनी त्यांना सिव्हिल रुग्णालयातून माझ्या रुग्णालयात दाखल केलं. आपल्यावर काही जणांनी हल्ला केल्याचं त्यांनी सांगितलं. प्राथमिक उपचार सिव्हिल रुग्णालयात करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारांसाठी माझ्या रुग्णालयात दाखल झाल्या. क्लिनिकल तपासणीत शरीरावर मारहाणीच्या हलक्या खुणा होत्या. पूर्णत: तपासणी केली असता रक्तस्राव झाल्याचं दिसत नाही. पाठीवर मुका मार आहे. काल रात्री आणि सकाळी केलेली युरिन प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली आहे. पोटात लाथाबुक्क्यांनी मारहाण झाल्याने सोनोग्राफी करण्यात आली, तिथे रक्तस्राव नसल्याचं दिसून आलं. तसंच कुठेही फ्रॅक्चर नाही. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.”

Advertisements
Advertisements

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button