क्राईममहाराष्ट्रमुख्य बातमीराजकारण

ठाण्यात ठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला मारहाण

 ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोड येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि ठाकरे गट पुन्हा एकदा आमनेसामने आल्याची घटना सोमवारी ३ मार्च रोजी ८.३० वाजण्याच्या सुमारास घडली. एकनाथ शिंदे यांच्या पत्नी विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी दीपक शिंदे यांना मारहाण करण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

रोशनी दीपक शिंदे काम करत असलेल्या कंपनीत घुसून शिंदे गटाच्या जवळपास १५ महिला पदाधिकारी व महिला कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. हा मारहाणीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला आहे. सध्या जखमी रोशनी शिंदे यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रोशनी शिंदे यांनी कासारवडवली पोलीस ठाण्यात लेखी तक्रार दिली आहे.

ठाकरे गटाच्या युवती सेनेच्या पदाधिकारी रोशनी दीपक शिंदे या टिटवाळा येथे राहतात व ठाण्यातील कासारवडवली येथे टाटा मोटर्स या ठिकाणी नोकरी करतात. रोशनी हा कामावरून सुटण्याच्या सुमारास म्हणजे जवळपास रात्री ८.३० वाजता शिंदे गटाच्या पूजा तिडके, माजी नगरसेविका नम्रता भोसले, प्रियांका मसुरकर, प्रतिक्षा विचारे, हर्षाली शिंदे, रोहिणी ठाकूर, अनघा पवार, सिद्धार्थ ओवळेकर व इतर १५ महिला अशा एकत्रित ऑफिसमध्ये घुसल्या आणि शिवीगाळ करून मारहाण केल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे.

या संपूर्ण प्रकरणात रोशनी या जखमी झाल्या असून त्यांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत रोशनी यांनी हल्ला करणाऱ्या महिलांच्या विरोधात सखोल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी लेखी केली आहे.

Advertisements
Advertisements

दरम्यान रोशनी शिंदे यांनी लेखी अर्जासोबत आक्षेपार्ह पोस्टचा मजकूर जोडला असून मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज देखील पोलिसांना दिले आहेत. पोलिसांनी शिंदे गटाच्या नमूद महिला आणि पुरुषांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ही करण्यात आलेली आहे. अधिक तपास कासारवडवली पोलीस करीत आहेत.

घटना अशी की, सोशल मीडियावर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यावर शिंदे गटाच्या दत्ताराम गवस यांनी आक्षेपार्ह पोस्ट केली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून रोशनी शिंदे यांनी आपले मत मांडले. परंतु या पोस्टनंतर दत्ताराम गवस यांनी रोशनी यांच्यावर वैयक्तिक कमेंट केली. या कमेंटमध्ये आपण कुठेही मुख्यमंत्री यांच्या बायकोचा उल्लेख केला नसल्याचे रोशनी यांनी लेखी तक्रारीत नमूद केलं आहे. मात्र रोशनी यांनी केलेल्या पोस्टनंतर त्यांना वारंवार धमकीचे कॉल येऊ लागले. कलह वाढू नये म्हणून मी सॉरी बोलल्यानंतरही जीवघेणा हल्ला केल्याचा दावा रोशनी शिंदे यांनी अर्जात केला.

Advertisements
Advertisements

Team Aaj Parbhani

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्याचा कोणी गैरफायदा घेत असतील तर संबंधित संस्था, व्यक्ती कॉपीराईट कायद्यानुसार जबाबदार राहतील. वृत्तसंकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या, लेख, किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही संचालक/संपादक सहमत असतील असे नाही. यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या बातम्या किंवा मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो parbhani न्यायालयांतर्गत राहील.

Related Articles

Back to top button